Saturday, December 20, 2014

My country India bharat - poem

II दूर माझा सुजलाम देश II 

प्रेमळ माझे बाबा आई 
तशीच माझी खट्याळ ताई 
माणसे आपली दूर दूर 
मनी माझ्या हीच हुर हुर II१II 

रक्ताची नाती आपली 
प्रेमाची  देती  सावली 
आठवण त्यांची मनात भरली 
प्रतिमा त्यांची उरात कोरली II२II 

तुम्हाविना मज करमत नाही 
काही मजला उमजत नाही 
तुमची जर का साथ नाही 
या  पैशाची  किंमत  नाही  II३II 

पैसा  पैसा  आणि  पैसा 
याच्याविना कोण बोले कैसा 
पाण्याविना का जगेल मासा ?
पैशाविना का जमेल माणसा ? II४II 

काळा पांढरा अरबी झगा 
म्हणती इथे शिस्तीत वागा 
चकाचक रस्ते मॉल मस्त 
नवीन गाड्या, पेट्रोल स्वस्त II५II 

आज मी इथे उजाड परदेश 
दूर माझा सुजलाम देश 
इथली तप्त भूमी वाळवंट 
दूर आप्त हीच मनी खंत II६II 


लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

ekach pyala - only one glass - poem

II एकच प्याला II

दारू प्यायला, पिऊन झिंगला
तोल त्याचा गेला, झेकांडीत पडला 
म्हणे घेतो मी , एकच प्याला  II१II

मातीत मळला, चिखलात माखला 
गटारात भिजला , नख शिखांत ओला 
म्हणे घेतो मी , एकच प्याला  II२II

घाणीत लोळला , उतारावर घसरला 
घरंगळत गेला , पडला उठला पडला 
म्हणे घेतो मी , एकच प्याला  II३II

दारावर धडकला , घरात घुसला 
बायकोशी भांडला , हात उगारला 
म्हणे घेतो मी , एकच प्याला  II४II

कीडणीस मुकला , तरीही प्यायला 
भिजवूनी गळा , बायको मुला बाळां 
म्हणे घेतो मी , एकच प्याला  II५II

खूपच प्यायला , धाडदिशी कोसळला 
प्राणांस मुकला , मेला तो मेला 
म्हणे पेला मी , एकच प्याला  II६II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.

पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

village and city - poem

|| गांव आणि शहर ||

शहरात शोधावे लागते एखादे झाड 
गावात बघावे तिकडे माडच माड ||१||

शहरात असते शुद्ध क्लोरिनचे पाणी 
गावात असते निर्मळ झ-याचे पाणी ||२||

गावात मिळते गाईचे धारोष्ण शुद्ध दूध 
शहरात मिळते प्लास्टीक पिशवीतले दूध ||३||

शहरात गाडी धुवायला पिण्याचे पाणी असते 
दुष्काळी गावात प्यायला गढूळ पाणीही नसते ||४||

गावात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन भरपूर 
शहरात अशुद्ध हवा , धुळीसोबत असतो धूर ||५||

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

|| माणूस शिक्षा भोगतो आहे ||

|| माणूस शिक्षा भोगतो आहे ||  

डम्पिंगवर कचरा साठला 
कचरा इथे जळतो आहे
श्वास इथे पुरा घुसमटला
धूर सर्वत्र पसरतो आहे ||

कचरा जळला, लागली आग
धूर विषारी हुंगतो आहे
आगीची पृथ्वीस,लागली धग
माणूस शिक्षा भोगतो आहे || 

आला जो आड वृक्ष कापला
मस्त शहर विस्तारत आहे
गावातला माड तोही कापला
बिनधास्त शहर वसत आहे || 

भेटवस्तू देऊनी एक तुळस
वाढ दिवसाला द्यावी शुभेच्छा
निसर्ग जपण्यास नको आळस
शुद्ध हवा मिळो हिच इच्छा ||

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
" वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

स्व. श्री राजीव दिक्षित ह्यांचे विचार - Rajeev Rajiv dixit dikshit

नमस्कार ,
मागे मी दोन पानी ''चिमणीची कथा , चिमणीची व्यथा'' हि आपल्या संस्थेशी संबंधित कविता 
पाठविली होती , मला माहित आहे (मागे माझे इमेल संभाषण झाले होते ) कि आपल्या संस्थेचे मराठी / हिंदी अंक 
फार कमी संख्येत प्रकाशित होतात , पण हि विषयाला अनुकूल असलेली कविता असून सुद्धा 
प्रकाशित झाली नाही हेच आपल्या समाजाचे दुर्दैव आहे , इंग्रजीत अंक जास्त प्रकाशित होतात त्याचा 
उपयोग काय ? कारण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जेव्हा काम करणे जरुरीचे आहे 
तेव्हा तुम्हाला स्थानिक भाषेतच ते मांडावे लागते , पण बऱ्याच सामाजिक संस्थांची आज हीच अवस्था आहे 
कि त्यांना एक तर परदेशातून देणग्या येतात , त्यामुळे त्यांचे साहित्त्य हे जास्त करून इंग्रजीत प्रकाशित होते 
आणि त्या संस्था मात्र स्थानिक पातळीवर काम करतात असे दाखवतात , ह्या बाबतीत स्व. श्री राजीव दिक्षित ह्यांचे 
विचार ज्यांना पटतात त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते ! वर्ल्ड बँकेच्या (अमेरिकेच्या ) दबावाखाली सर्व देशच  
दबलेला आहे तिथे अशा संस्था आणि माझ्यासारखे सामान्य माणसे काय करणार ? 
सत्ता बदल होतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात त्याचा काहीच फरक पडत नाही हेच खरे.  

नशीब कि आता शेतकऱ्यांना सावध करून नैसर्गिक शेणखत वापरूनच नैसर्गिक शेती करावी ह्याचा प्रसार होत आहे 
रासायनिक खतानी थैमान घातले ज्यामुळे पक्षांसकट सर्व जैव साखळी धोक्यात आली होती / आहे 
पण वेळीच सावध झाल्यमुळे तो धोका टळेल / कमी झाला आहे, पण हे काम ज्या सामाजिक संस्थांनी 
करायला हवे त्याऐवजी काही नि:स्वार्थी समाज सेवक हे काम करत आहेत. आणि पक्षी प्राणी माणूस ह्या  
जीव साखळीला विषारी पर्यावरणापासून वाचवत आहेत , सोबत जोडलेल्या लिंकवर ध्वनी चित्रफिती पहाव्यात 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे.

अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे. 
१० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन आहे. 
खरे म्हणजे आपल्या ऋषी मुनींच्या संस्कृतीला अनुसरून विचार केला तर माणसाच्या मुलभूत गरजा आणि त्या मिळण्याचा 
अधिकार हा प्रत्येक मानवाला आहे , आणि त्याला सर्व जगाने प्राधान्य दिले गेले पाहिजे , पण आज असे चित्र दिसत नाही 
आज २०-३० टक्के जनता ज्या सुख सुविधा उपभोगते त्या उरलेले ७०-८० टक्के सामान्य माणसाला मिळत नाहीत 
पण ते एका अर्थी चांगलेच आहे कारण हा जो 30 टक्के समाज जे सुख समजतो ते खरे सुख नसतेच हे जेव्हा माणूस 
आजारी पडतो तेव्हा त्याला कळते , आजारी पडल्यावर माणसाला विचारा तुला हिऱ्याची अंगठी हवी ,आलिशान गाडी 
एटीएम मशीन , विमान प्रवास , ३० व्या मजल्यावर घर इत्त्यादी हवे का ? 
तो म्हणेल नको मला आधी आजारातून बरे होउदे , आणि हेच मुख्य तत्व आपल्या ऋषी मुनींनी सांगितले आहे 
कि शरीराच्या गरजा कमीत कमी ठेवा म्हणजे सर्व समाज आणि जग सुखी होईल , आणि आज तेच दिसते आहे 
मुलभूत गरजा शुद्ध स्वरुपात जपण्याचे सोडून अन्य चंगळ वादाच्या , उपभोगाच्या 
वस्तूच्या गरजा माणसाने वाढवून ठेवल्या आहेत त्यामुळेच आज प्रदूषणाचा विळखा जगाला पडला आहे 
आणि त्यात माणसाचे मरण होत आहे तरी तो आज सुधारायला तयार नाही , त्यामुळे माणसाच्या मुलभूत 
गरजा शुद्ध पाणी , हवा आणि अन्न हेच आज अशुद्ध प्रदूषित झाले आहे , शरीर ठीक राहिले तर ह्या वरच्या गोष्टी 
माणूस उपभोगणार , हे लंगोटी लावून जीवन जगणाऱ्या लोकांना चांगले कळू शकते , ह्याचा अनुभव मी स्वतः नर्मदा 
परिक्रमा करताना घेतला तेव्हा १०० टक्के पटते . तिकडे अजून माणुसकी जिवंत आहे , कोणी असे म्हणत नाही हि जमीन 
माझी वगैरे , ते म्हणतात जमीन देवाची , पाणी देवाचे , ऊन देवाचे मी फक्त शेतात राबतो हजार दाणे पेरतो आणि मग 
देव लाखो दाणे निर्माण करतो , मग त्यावर माझा अधिकार कसा ? म्हणून तिथे सर्वाना अन्न दान मोफत 
केले जाते , पण ह्या तिकडे टिकलेल्या आपल्या विचाराच्या संस्कृतीवरहि आता धरणे बांधून हल्ला होऊ पाहतो आहे 
धरणे बांधून नदीचे पाणी सरकार अडवणार , विकणार . आणि मग ह्याची सत्ता कोणाकडे ह्यासाठी लढाया,
हे कोण करतय तर जागतिक बँक (अमेरिका इत्त्यादी देश )
देवाला विकत घ्यायला आणि विकायला निघालेत असे म्हणणे योग्य ठरेल कारण आपली संस्कृती सर्वा भूती परमेश्वर मानते   
पाणी म्हणजे , नदी म्हणजे आपण देवता मानतो. शांतीचा मार्ग सोडून अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे. 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

swatantrya veer vir savarkar sawarkar - poem

II स्वातंत्र्यवीर सावरकर II

स्फूर्ती देई त्यांना भारतमाता
उलथवीण्या ब्रिटीशांची सत्ता 
त्यांनी उठाव केला होता 
जयहिंद नारा दिला होता II१II

देशभक्तीची मुखी झळाळी 
गोऱ्यांविरुद्ध मूठ आवळली 
जहाल मतांनी केली खेळी 
प्रतीकारांची ठिणगी टाकली II२II

लढण्याचे केले ज्यांनी धाडस 
अगम्य होते त्यांचे साहस 
स्वातंत्र्याचा घेतला ध्यास 
लढूनी प्रयत्न केले खास II३II

शत्रुविरुद्ध सामोरी तत्पर 
उभे ठाकले जे कणखर
लढले ते अत्त्यंत प्रखर 
मराठी शूर वीर सावरकर II४II

होती स्वातंत्र्याची अपेक्षा 
विसरले तहान आणि बुभुक्षा 
शत्रूने ठोठावली त्यांना शिक्षा 
काळे पाणी भोगली शिक्षा II५II

घाव झेलले किती छातीवर 
मातेसाठी उदार जीवावर 
लढले अखंड ते रात्रौप्रहर 
स्वातंत्र्य अखेर पाहिले भूवर II६II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

डासांचे श्लोक - mosquito bite , malaria dengu

नमस्कार ,
डास चावून होणाऱ्या आजारी रुग्णांची संख्या वाढली आहे त्यावर आधारीत 
डासांचे श्लोक हे लिहिले आहेत , सध्या डेंग्यूची चर्चा जास्त होते पण त्याच 
बरोबर डास चावून हत्तीरोग जो होतो तो तर आणखी भयंकर आहे ,
महाजालावर बरीच माहिती उपलब्ध आहे. हे छापणार असाल तर कृपया 
तसे लवकर कळवावे , धन्यवाद 
Inline image 1

Friday, December 19, 2014

II प्रदूषण आणि दुष्काळ II - pollution and harvest - suresh pitre

II प्रदूषण आणि दुष्काळ II

जेव्हा झाली प्रगती मानवाची 
तेव्हा वाढली रेलचेल यंत्रांची 
वाढ झाली इथे कारखान्यांची 
निर्मिती झाली जगांत शहरांची II१II

शहरांत झाली गर्दी खेडुतांची  
बजबजपुरी झाली सर्व शहरांची 
कारखान्यांना गरज भासली इंधनाची 
गरज पूर्तीसाठी केली झाडतोडी II२II

नष्ट झाली शोभा जगांत निसर्गाची 
झाली मरुभूमी या नंदनवनाची 
डोंगर उजाड, नांदी हि वाळवंटाची 
झाली वाढ भयंकर तापमानाची II३II

झाली घट अतिशय पर्जन्यमानाची  
पातळी वाढली धूर, धूळ, प्रदूषणाची 
खेडेगावात शेतीला टंचाई पाण्याची 
शेतकऱ्याला लागली झळ दुष्काळाची II४II

कृषिप्रधान देशाला कमतरता धान्याची 
दारिद्र्य रेषेखाली उपासमार जनतेची 
तरुणांवर वेळ आली बेरोजगारीची 
झाली उन्हाने लाही लाही शहरवासियांची II५II

विजेची टंचाई, सक्ती भार नियमनाची 
तज्ञांची ओरड, झाली हानी निसर्गाची 
वेळ आली आता रोपे लावण्याची 
झाडे वाढविण्याची,पर्यावरण जपण्याची II६II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

II थोडेसे पैसे हे पुरवायचे तरी हो कसे ? II

II थोडेसे पैसे हे पुरवायचे तरी हो कसे II

नवरा म्हणे बायकोला हे जे थोडेसे आहेत पैसे
तुझ्यावर,मुलांवर,संसारावर खर्च करू गं कसे ?
चार आकडी पगाराचे कष्टाचे हे माझे पैसे
महिनाभर पुरतात मला संसाराला कसे बसे 
IIII
साडीसाठी बायकोचा हट्ट नेहमीच असे
माझेही वाक्य तेव्हा तोंडपाठच असे !
तूच सांग अगं ! प्रिये, लाडके , राजसें !
थोडेसे माझे पैसे अगं ! मी पुरवायचे कसे ? 
IIII
बायकोची मागणी हिरे घ्यांना मला इवलेसे
समजाविले मी हो तिला कसे नी बसे !
बायको म्हणते ! तुम्ही नेहमी असे हो कसे ?
कायमच कफल्लक ! रिकामे तुमचे खिसे 
IIII
देणेकऱ्यांचे पैसे मी द्यायचे तरी हो कसे ?
महिन्याचे कर्जाचे हप्ते मी फेडायचे हो कसे ?
संसाराचे खर्च किती, कुठे आणि कसे ?
एवढ्याशा पगारात मी पुरवायचे तरी कसे ? 
IIII
मुलाला डॉक्टर मी करायचे तरी हो कसे ?
मुलीला इंजिनीअर मी करायचे हो कसे ?
महागाईला तोंड मी द्यायचे तरी कसे ?
वाढत जाणारे खर्च भागवायचे हो कसे ? 
IIII

नवे मोठे घर मी विकत घ्यायचे तरी हो कसे ?
मुलीचे लग्न आता मी लावायचे हो कसे ?
क्रेडीट कार्डचे पैसे काहीजण भरतात हो कसे ?
कष्टाचे थोडेसे पैसे मी पुरवायचे हो कसे ? 
IIII
अहो पैसे पैसे पैसे ! तुमचे आमचे जनतेचे पैसे !
काही भ्रष्टाचारी लोकांनी खूप खाल्ले ना पैसे ?
वर्षानुवर्ष त्याच योजनांवर खर्चहि झाले पैसे
उपाय नाही म्हणून वाया गेले कष्टाचे पैसे ! 
IIII
एक हजारांची नोकरी करतात कष्टकरी माणसे
जीव टांगणीला टाकत प्रवास करतात कसेबसे ?
भ्रष्टाचारी लोकांना हे सारे दिसणार तरी कसे ?
भ्रष्टाचारी बोके सारे, डोळे मिटून दुध पितात जसे 
IIII
कोणी म्हणे ! परदेशी बँकेत आहेत, करोडो भारतीय पैसे !
लोकं बोंब मारतात, भारतात परत आणा हे जनतेचे पैसे
मग कोणालाच कमी पडणार नाहीत हो खर्चाला पैसे !
प्रश्नच पडणार नाही, थोडेसे पैसे पुरवायचे तरी
 कसे ? IIII
लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           
Email ID - kharichavata@gmail.com

परम आत्म्याचा बोध घ्यावा

परम आत्म्याचा बोध घ्यावा 

जीवन एक अनमोल ठेवा 
फुलाचा मंद सुगंध हुंगावा 
पक्षांचा किलबिलाट ऐकावा  
प्रसन्न छान सूर्योदय पहावा

निसर्गगंध छातीत भरावा 
छान फुलांचा गुच्छ पहावा 
पानावर दवाचा थेंब पहावा 
थेंब गार हातावर घ्यावा 

भिरभिरणारा चतुर पहावा 
सळसळनारा साप पहावा 
गाईचा हंबरडा ऐकावा 
निसर्ग पुन्हा पुन्हा बघावा 

पांढराशुभ्र नितळ हंस पहावा 
झऱ्यांचा खळखळाट ऐकावा 
शांत पाण्यात तरंग पहावा 
रौद्र कोसळता धबधबा पहावा 

जणू गालीचा गार गर्द हिरवा
राकट कणखर दगड पहावा 
दगडात एक आकार शोधावा 
भारदस्त छातीचा पहाड पहावा  

अथांग निळाशार समुद्र पहावा 
अस्ताचा लालबुंद सूर्य पहावा 
शांत शीतल निर्मळ चंद्र पहावा 
प्रदीर्घ मोठ्ठा श्वास घ्यावा 

जीवनानुभव प्रत्यक्ष घ्यावा 
हृदयाचा ठोका ऐकावा  
एक मोठ्ठा सुस्कारा द्यावा 
परम आत्म्याचा बोध घ्यावा 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

गोरक्षण आणि संवर्धन - protect save indian cow

नमस्कार ,
गोरक्षण आणि संवर्धन हे आज संपूर्ण जगासाठी अत्त्यंत आवश्यक आहे , ह्याचा प्रचार प्रसार लवकर आणि सर्वत्र 
होणे आज गरजेचे आहे , प्रसार माध्यमांनी ह्याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे , ह्या ध्वनी चित्रफिती मध्ये 
अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरानी ह्यावर संशोधन केले आहे त्याची माहिती दिली आहे , हे पाहून ऐकून 
आता आपल्यालाही पटेल कि शेती प्रधान संस्कृतीच जगाला खरे सुख आणि समाधान देऊ शकते 
कारण विचार केला तर लक्षात येईल कि माणसाला गाडी , बंगला हि साधने कधी सुख देतील 
जेव्हा माणसाचे शरीर स्वस्थ असेल आणि ते स्वस्थ राहण्यासाठी शुद्ध अन्न,पाणी हवा फक्त आणि फक्त हेच 
उपयोगी आहे , आणि ह्या तिन्ही गोष्टी आज प्रदूषित झाल्या आहेत , मग कसे आरोग्य शांती सुख लाभेल?
म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी आज समाजाची अवस्था आहे , 
समाजात रोग , अशांती आणि दुःख दूर करण्याची समाजाची इच्छा आहे आणि त्याला उपाय एकमेव आहे 
तो म्हणजे शेती प्रधान भारतीय संस्कृती आणि गोरक्षण गोसंवर्धन. ह्याला फक्त धार्मिक अंक किंवा रंग कोणी 
देऊ नये आणि ह्याचे महत्व सर्व जगाला पटवून देणे गरजेचे आहे , तेव्हाच संपूर्ण गोहत्त्या यशस्वी होऊ शकते 
आणि संशोधनांती असे इथे म्हटले आहे कि भारतीय गोवंशच ह्यासाठी उपयोगी आहे, भारतात एकूण १०८ जाती 
होत्या , ब्राझील देशात त्या नेल्या गेल्या आणि सांभाळल्या गेल्या असेहि दुसऱ्या मराठी चित्रफितीत माहिती दिली आहे 
ह्या विषयाला लवकरात लवकर प्रसिद्धी प्रत्येक प्रसर माध्यमाने देणे अति आवश्यक आहे,

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

II पश्चाताप II

II पश्चाताप II 

खेड्यातून आला , शहरात रमला 
अंगवळणी पडला, शहराचा थाट रे 

इथेच राहिला , रडत खडत जगला 
माणसाने भोगला, शहराचा ताप रे 

धुराने घुसमटला, धुळीने गुदमरला 
काजळीने काळा झाला, छातीचा भाता रे 

खोकल्याने हबकला, धापेने थकला 
खाली वर झाला , माणसाचा जीव रे 

उपभोग वादाला, चंगळ वादाला 
प्लास्टीक पिशवीला, सरावला तूच रे 

वायु प्रदूषणाला, ध्वनी प्रदूषणाला 
जल प्रदूषणाला , कारण तूच रे 

संयम सोडला , परिणाम भोगला 
तूच रे दाबला , गळा तुझाच रे 

प्राण कंठी आला, पश्चाताप झाला 
प्राण तुझा गेला, हाय रे हाय रे 


लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

II कवीचे काव्य II

II कवीचे काव्य II

कवीचे काव्य म्हणजे विलक्षण असते ,
एखाद्या गोष्टीचे आंतरबाह्य निरीक्षण असते,
शब्दांना चढलेले एक दिव्य स्फुरण असते,
उपमा आणि अलंकारांनी नटलेले विवरण असते.II१II

कवीचे काव्य म्हणजे नुसती कविताच नसते,
न्यायाधीश बनून दाखविलेली समताच असते 
न्यायाचे पारडे इथे समानच असते ,
कवीला कोणी आपले किंवा परके नसते. II२II

कवीच्या मनात असते सचोटी ,
शब्द गुंफण्याची असते हातोटी,
म्हणूनच नाठाळाच्या माथी ,
हाणू शकतो शब्दांची काठी . II३II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

Tuesday, August 19, 2014

GOVINDA KAVITA GAJAL

नमस्कार ,
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही गोविंदा जखमी होणे , मरणे हे प्रकार झालेच आहेत त्यावर 
आधारित गजल प्रकारातील हि कविता छापण्यासाठी देत आहे - सुरेश पित्रे 

''गोविंद'' त्याला भेटेल का? 

कायदा इथे आहे तरीही   
डीजेंचा डणडणाट आहे 
गोविंदा इथे जखमी तरीही 
उत्सव हा जोमात आहे II१II

हात पाय मोडले तरीही 
उत्सव जल्लोशात आहे 
गोविंदा तो मरतो तरीही 
होश इथे कोणाला आहे ? II२II

जीव मुलाचा जातो तरीहि 
पैशाचा लोभ संपत नाही ?
पोटचा मुलगा मरतो तरीही 
बाप विम्याचे हिशोब पाही? II३II

प्रेक्षक दुरून खेळ पाहतो  
गोविंदा वरून पडतो आहे
सामान्य हा माणूस मरतो
समाज इथे नुसताच पाहे II४II

ह्यांचा एक दिवसाचा खेळ 
दरवर्षी नित्त्य नेमेची आहे 
आयुष्यभर हा भोगतो खेळ 
गोविंदा जो जायबंदी आहे II५II

डोके फुटते तरीहि ह्यांच्या  
डोक्यात शिरत नाही का ? 
गोविंदा वर पोचला तरी 
''गोविंद'' त्याला भेटेल का? II६II

डीजेचा डणडणाट तरीही 
भजन कानात शिरले नाही  
थंड पाण्यात नाहला तरी 
खऱ्या भक्तीत भिजला नाही II७II

रंगात ह्या रंगला तरीही
रंग भक्तीचा कळला नाही 
फुलांनी हंडी सजली तरीहि 
भक्तीचा सुगंध कळला नाही II८II

डीजे तालावर नाचला तरी 
कृष्णाचा ताल कळला नाही  
दही हंडी उंच बांधली तरी
बुद्धीची उंची वाढली नाही II९II

भिंती ह्या हादरल्या तरीही 
ध्वनीक्षेपक दणाणत आहे 
कान पार किटले तरीही 
डिस्को दणक्यात चालु आहे II१०II

कायदा इथे असला तरीहि 
पाळणारे सभ्य कोण आहे ?
गोविंदाचा जीव गेला तरीही 
जोर धन दांडग्यांचा आहे II११II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.