II स्वातंत्र्यवीर सावरकर II
स्फूर्ती देई त्यांना भारतमाता
उलथवीण्या ब्रिटीशांची सत्ता
त्यांनी उठाव केला होता
जयहिंद नारा दिला होता II१II
देशभक्तीची मुखी झळाळी
गोऱ्यांविरुद्ध मूठ आवळली
जहाल मतांनी केली खेळी
प्रतीकारांची ठिणगी टाकली II२II
लढण्याचे केले ज्यांनी धाडस
अगम्य होते त्यांचे साहस
स्वातंत्र्याचा घेतला ध्यास
लढूनी प्रयत्न केले खास II३II
शत्रुविरुद्ध सामोरी तत्पर
उभे ठाकले जे कणखर
लढले ते अत्त्यंत प्रखर
मराठी शूर वीर सावरकर II४II
होती स्वातंत्र्याची अपेक्षा
विसरले तहान आणि बुभुक्षा
शत्रूने ठोठावली त्यांना शिक्षा
काळे पाणी भोगली शिक्षा II५II
घाव झेलले किती छातीवर
मातेसाठी उदार जीवावर
लढले अखंड ते रात्रौप्रहर
स्वातंत्र्य अखेर पाहिले भूवर II६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
No comments:
Post a Comment