Saturday, July 19, 2025

copy paste from facebook 

*वैद्यकीय क्षेत्रासंबंधी अतिशय गंभीर बाब*

सर्वांनी गांभीर्याने वाचा आणि विचार करा *
*भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे. असे भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे*
*झी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात. याचा अर्थ, हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळ जवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात. याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की, भारतात केल्या जाणाऱ्या ५५ % हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात. ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कॅन्सर सर्जरी, ४८% गुढघे प्रत्यारोपण, ४५% सिझेरियन (कृत्रिम प्रसूती), खांदेरोपण, स्पाईन सर्जरी ई*
*महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्स मध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की, मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनिअर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते. याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसतांना अधिक तपासण्या, उपचार, एडमिट करणे आणि शस्त्रकीया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते. (BMJ GLOBAL HEALTH )*
*मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत घृणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे*
*एका नामांकित हॉस्पिटलमध्ये १४ वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना Vhentilator वर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले. तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले. हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय?*
*अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो. त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते. नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करतांना मरण पावल्याचे जाहीर केले जाते. भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते. (DISENTING DIAGNOSIS- DR. GADRE& SHUKLA)*
*इंश्युरंस म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे*
*भारतात सुमारे ६८% लोकांनी मेडिक्लेम इंश्युरंस घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्त्या करून रुग्णांना इन्स्यूरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते. बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागतो*
*इंश्युरंसचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इंश्युरंस कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इंश्युरंस कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकीस आले होते*
*मानवी अंगांची तस्करी हा एक अतिशय घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे. हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा. संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते. कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित फोर्टिस हॉस्पिटलला जाण्याची सूचना केली. सांगिताला रितसर रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे DONAR वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तीने तिथून पळ काढला. ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगिताला धमकाविले आणि ५० हजार रुपये मागू लागला. तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी अंती एका मोठ्या हजारो कोटी रुपयांच्या अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफास झाला. पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या प्रकरणात पोलीस, डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामिल होते*
*'हॉस्पिटल रेफरल स्कॅम' हा तर सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणार प्रकार आहे. आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला एडमिट होण्यास सांगतात. अपोलो, फोर्टिस, अपेक्स इ. अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात. असे हॉस्पिटल्स डॉक्टर साठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात. मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक ४० रुग्ण पाठविण्यासाठी एक लाख रुपये, ५० रुग्णासाठी दीड लाख रुपये, ७५ रुग्णासाठी अडीच लाख रु. देण्याचे लिखित स्वरुपात जाहीर केले होते. रुग्णाला काही झालेले असो अगर नसो फक्त रुग्ण पाठविण्याची रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यात जमा केली जाते*
*'डायग्नोसिस स्कॅम' हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यावधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे. बंगुलुरू येथील काही नामांकित पेथोलॉजी LABS वर इन्कम TAX विभागाच्या धाडीमध्ये अनेक LABS कडे १०० कोटीच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते. पुढे असे आढळून आले की, डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते. रुग्णाला काही झाले असो किंवा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअप साठी पाठवितात. तिथून त्यांना ४०–५०% कमिशन मिळते. जबरदस्ती केलेल्या या चेकअप मधील १ ते २ तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात. हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे. त्यामुळेच देशात सुमारे दोन लाखाच्या वर LABS कार्यरत आहेत. परंतु यातील फक्त एक हजारावर LABS प्रमाणित आहेत*
*असाच एक मोठा स्कॅम फार्मा कम्पन्या सुद्धा चालवितात. देशातील २० ते २५ मोठमोठ्या औषधी कम्पन्या डॉक्टरांवर एक-एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात. डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जगजाहीर झाले आहे. डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध लिहावे म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश, विदेश दौरा, पंचतारांकित हॉटेलमध्ये ५ ते ७ दिवसांचे वास्तव्य ई. USV LTD. कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला ३ लाख रु. कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ट्रीप देते*
*हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्याचे एक वेगळे स्कॅम आणखी आहे. अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी, सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात. त्यावर MRP मात्र प्रचंड असते. इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे. EMCURE कंपनी आपले टेमीक्युअर हे कॅन्सरचे औषध हॉस्पिटलना १९५० रुपयांना देते. हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे १८६४५ रुपये वसूल करतात. यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत. (इंडिया टुडे हॉस्पिटल स्कॅम सर्व्हे रिपोर्ट)*
*मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. २०१६ मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली. या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, MCI नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल्स वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे*
*देशातील डॉक्टर MCI च्या नियमांची रोज पायमल्ली करतात, परंतु याची जनतेला कल्पना नसते*
*उदा*
*👉१. डॉक्टरने कोणत्याही कंपनीचे ब्रान्डेड औषध लिहायचे नसून साल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे*
*👉२. क्लाॅज १.८ नुसार उपचार करण्या आधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे. इ. अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते*
*👉३. तपासण्या आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्विकृती घेणे आवश्यक आहे*
*👉४. प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या ३ वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे*
*👉५. व्यवसायातील भ्रष्ट, अनैतिक, अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे*
*👉६. शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे. माजी सैनिक हॉस्पिटलला गेला की, त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरीसुद्धा एडमिट केले जाते. त्याच्या कार्डवरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसविले जाते. रुग्णावर नको ते उपचार करण्याचा देखावा केला जातो. ७/८ दिवसात सुटी दिली जाते. तोपर्यंत त्याचे लाखोंचे बिल सरकारी योजनेतून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपेने डॉक्टरच्या खात्यात जमा झालेले असते. अर्थातच खोट्या चेकअप आणि तपासण्याचा, उपचारांचा कागदोपत्री आधार याला द्यावा लागतो*
हा मेसेज प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब यापासून वाचायला हवे*
*जनहितार्थ देशसेवा*
*सत्यमेव जयते*
*🇮🇳🇮🇳

Saturday, June 9, 2018

येऊ दे तुफान | येऊ दे तुफान |
शहरांत आतां | पाण्यासाठी ||
एके काळी होता | चेंदणी तो भाग | जुना गावठाण | ठाणे गांव ||१||
इथे होते वाडे | अशा रचनेचे | मागे ती विहीर | पुढे घर ||२||
दोन मजली ती | टुमदार घरं | वाडा संस्कृतीची | होती गल्ली ||३||
पुढे मोठे घर | वाड्यात विहीर | रहाट गाडगं | विहिरीला ||४||
बाकी ती मोकळी | जागा झाडांसाठी | नाना प्रकारची || झाडे होती ||५||
एकूण वाड्याची | जमीन पाहिली | साठ टक्के जागा | मोकळी ती ||६||
मग अशा जागी | पाणी मुरायचे | झरे वाहायचे | विहिरीत ||७||
पाऊस पडतां | तुडुंब विहीर | भरून जायची | ओसंडून ||८||
झाडे होती खूप | त्यांना मिळे पाणी | न्हाणी घराचे ते | सोडले जे ||९||
जमिनीत पाणी | असे मुरायचे | झाडांना पाणी ते | पुरायचे ||१०||
कोणे एके काळी | चेंदणी भागांत | पाणी मुरायचे | पावसाचे ||११||
नव्हतेच तेव्हा | पाणी ते नळाला | आंघोळी सर्वांच्या | विहिरीत ||१२||
पिण्यायोग्य होते | विहिरीचे पाणी | होता तो उपसा | विहिरीला ||१३||
वाडा दिसे छान | हिरवागार तो | नैसर्गिक थंड | हवा होती ||१४||
मग दिवाळीत | सणाच्या दिवशी | थंडी हा मौसम | वाटायचा ||१५||
आता ती थंडी | नाही जाणवत | पळून ती गेली | कायमची ||१६||
उन्हाच्या त्या झळा | इतक्या नव्हत्या | मुरायचे पाणी | मुबलक ||१७||
म्हणून रे बाबा | पूर्ण वर्षभर | थोडे थंड वाटे | जुन्या काळी ||१८||
भासली नव्हती | गरज पंख्यांची | वातानुकूलन | यंत्रांचीही ||१९||
वाडे ते पाडले | चाळी हो पाडल्या | नवीन बांधल्या | इमारती ||२०||
वाडा संस्कृतीचा | नाश तो रे झाला | अध्याय संपला | एक मोठा ||२१||
काळाच्या उदरीं | गडप तो झाला | वाड्यांचा तो काळ | भूतकाळ ||२२||
शेताड जमीन | खूप होती इथे | जुन्या ठाण्यामध्ये | जुन्या काळी ||२३||
वन जमिनीची | वाताहत झाली | वृक्ष तोड झाली | खूप खूप ||२४||
गावठाण गांव | शहर बनले | शहर वाढले | चहूं दिशे ||२५||
फार थोडी आहे | जमीन उघडी | हातावर मोजा | मैदाने ती ||२६||
फार थोड्या बागा | आहेत हो छोट्या | कुठे मुरणार | पाणी आता ||२७||
रस्ता रुंदीकरण | शहरांत झाले | रस्तेही बांधले | सिमेंटचे ||२८||
भूमी बंद केली | सिमेंट लावूनी | पाणी ते वाहते | गटारांत ||२९||
पाणी थेट जाते | मोठ्या गटारांत | तिथून ते जाते | खाडीमधे ||३०||
भूमी तहानली | कोरडी पडली | थंडावा तो गेला | जमिनीचा ||३१||
झरे ते वाळले | विहिरी आटल्या | कोरड्या पडल्या | शहरांत ||३२||
कूपनलिका त्या | गृह संकुलांत | अनेक खोदल्या | पाण्यासाठी ||३३||
लागे वीज खूप | पंप ते चालती | पाणी ते आटले | जमिनीचे ||३४||
निसर्गाची टाकी | पाण्याची रिकामी | कोण भरेल ती | जाणावे बा ||३५||
उपाय तो आहे | पाणी भरा आता | निसर्गाची टाकी | पुन्हा भरा ||३६||
जितके घेतले | तितके भरावे | उपसा करावा | तितकाच ||३७||
भावी पिढीचे ते | आ-ताच घेतले | पाणी ते आ-ताच | उपसलें ||३८||
पुन्हा पाणी भरा | एक तो कोपरा | मोकळा असावा | पाण्यासाठी ||३९||
गृह संकुलात | पावसाचे पाणी | मुरविणे आहे | जमिनीत ||४०||
छपराचे पाणी | जाते वाहून ते | गटारात वाया | जाऊ नये ||४१||
पावसाचे पाणी | गोड ते निर्मळ | वाया गेले पहा | किती वर्षं ||४२||
गोड पाणी जाते | खाडीत मिळते | सांडपाणी होते | खारट ते ||४३||
खाडीत मिळते | पावसाचे पाणी | आधीच जिरवा | जरुरी ते ||४४||
आधीच मुरवा | पाणी जमिनीत | करावी व्यवस्था | त्वरेने ती ||४५||
करावा तो खड्डा | एक कोपऱ्यात | टाकावे दगड | तयामधे ||४६||
छपराचे एक | पन्हळ जोडावे | खड्ड्यात सोडावे | पाणी आता ||४७||
हजारो लिटर | पाणी ते मिळेल | शहरी भागात | आरामात ||४८||
क्षारता पाण्याची | कमी ती होईल | पाणी मुरवितां | पावसाचे ||४९||
गोड पाणी तुम्हा | पुन्हा ते मिळेल | नकोच ती चिंता | पाण्यासाठी ||५०||
सर्व शहरांत | गृह संकुलांत | पाणी मुरवावे | पावसाचे ||५१||
पाणी जिरंवावे | स्वावलंबी व्हावे | नको रडगाणे | उन्हाळ्यात ||५२||
वाढली ती संख्या | गृहसंकुलांची | पाण्याचा तो प्रश्न | सोडवावा ||५३||
भविष्यात धरण | फुटले जर ते | किती तो उडेल | हाहाःकार ||५४||
त्याचीच योजना | आ-ताच करावी | पाणी साठवा ते | जमिनीत ||५५||
नको आता प्रश्न | हिय्या तो करावा | निश्चय धरावा | पाण्यासाठी ||५६||
पाणी हे जीवन | जाण रे माणसां | होत का नाहीरे | कारवाई ||५७||
पाणी मुरविणे | सामाजिक देणे | ऋण ते फेडणे | निर्सगाचे ||५८||
होईल जीवन | सुखी समाधानी | पाणी मुरवा ते | जमिनीत ||५९||
पर्यावरणाची | साखळी जोडणे | तेच रे कल्याण | मानवाचे ||६०||
आता खेडेगावी | तुफान आलया | मोहीम चालली | जोरदार ||६१||
पण इथेसुद्धा | गरज आहे ती | शहरांत पाणी | मुरवावे ||६२||
पावसाचे पाणी | शहरीं मुरविता | वाचेल ते पाणी | धरणाचे ||६३||
हजारो लिटर | मुबलक पाणी | बचत पाण्याची | धरणांत ||६४||
उरलें जे पाणी | गावाला मिळेल | एकमेका सहाय्य | होईल हो ||६५||
वळवा ते पाणी | जिथे आहे शेती | मुबलक धान्य | पीकवा ते ||६६||
शेतीला पाणी ते | मिळेल असे हो | प्राधान्य ते द्यावे | योजनेला ||६७||
पाणी मिळतां ते | सुखाने नांदेल | बळीराजा त्याच्या | घरामधे ||६८||
गृह संकुलात | जमिनीत आता | मुरेल ते पाणी | खूप खूप ||६९||
आपणही आता | शहरांत सुद्धा | तुफान आलंया | म्हणूया रे ||७०||
येऊ दे तुफान | येऊ दे तुफान | शहरांत आतां | पाण्यासाठी ||७१||
लेखक / कवी - सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे (पश्चिम)

Friday, March 10, 2017

पक्षांना दे करवंटीचे घरटे


नमस्कार ,
शहरात कचऱ्याची समस्या खूप वाढली आहे , आणि जुनी घरे / झाडे जाऊन
तिथे उंच इमारती उभ्या राहिल्या , तर एक फोटो महाजालावर पाहिला 
त्याला अनुसरून एक कविता लिहिली आहे , जी फोटोबरोबर छापली तर 
शहरातील सर्वजण हि नामी कल्पना अमलात आणून आपली निसर्गाशी 
तुटलेली नाळ पुन्हा जोडायचा प्रयत्न करतील . फोटो मी काढलेला नाही 
त्यामुळे तो छापण्यासाठी परवानगी आहे कि नाही ते तुम्ही तपासावे , 
पण ज्याने ह्या छान कल्पनेचा फोटो काढला आहे त्यालाच अनुसरून मी कविता 
लिहिली आहे , त्यामुळे त्यांचा फोटो छापण्यासाठी आक्षेप नसावा. 
  
।। पक्षांना दे करवंटीचे घरटे ।।

माणसा तू जिथे तिथेच होते 
त्या झाडावर त्यांचे घरटे 
झाडही गेले घरही गेले 
उभारली इमारत ऊंच इथे 

फुकट जाते कचऱ्यात मिळते 
त्यात पक्षांचे घर वसते 
फेकू नका कचऱ्यात करवंटी 
त्यात होतील पक्षांची घरटी 

बांधून ठेवा ऊंच ठिकाणी 
मजेत ऐका पक्षांची गाणी  
आधुनिक जीवन प्रगती करते 
निसर्गाशी तुटले आपुले नाते 

ना तरी फुकट कचऱ्यात जाते 
निसर्ग देतो फुकट तुला ते 
इतकीच मानवा विनंती येथे 
पक्षांना दे करवंटीचे घरटे 

पक्षांची किलबिल कानी पडते 
नाळ पुन्हा निसर्गाशी जुळते 
फुलेल त्यांचा संसार इथे 
पक्षांना दे करवंटीचे घरटे 
कवी - सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे 

Tuesday, May 19, 2015

मी आहे वटवृक्ष एकटाच !

नमस्कार 
वट पौर्णिमा जवळ आली आहे , गुगलवर शोधले तर वट पौर्णिमेची तारीख वेगवेगळी सापडते  ,
त्या निमित्त एक गद्दकाव्य लिहिले आहे,
अगदी मुंबईच्या सरहद्दीवर ठाणे शहरात शिरताना, (आतल्या रस्त्याला ) कोपरी गाव  
लागते तिथे पूर्वी सर्व जंगल होते , आता तिथे मुंबई हद्दीत खाडी किनारी हरी ॐ नगर हि मोठी वसाहत 
उभी राहिली आहे , त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर 
अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही तो वटवृक्ष उभा आहे , तिथून नेहमी जाता येताना 
मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे , आणि आता वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडल्या जातील तेव्हा जणूकाही 
तोच वटवृक्ष त्याची कथा सांगतो आहे अशा रीतीने हे गद्दकाव्य लिहिले आहे. 
शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही कदाचित ह्याच भावना असतील नाही का ?
- सुरेश पित्रे , ठाणे 
मी आहे वटवृक्ष एकटाच !
वट पौर्णिमेसाठी माणूस आला वडाजवळ फांद्या तोडायला  
पण वड लागला बोलायला आणि सांगु लागला त्या माणसाला  
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला 
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला 
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड 
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय 
होते इथे जंगलमाझ्या सभोवती सखे,सोयरे, माझे सोबती 
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं  
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती 
सुदैव माझं मी राहलो जिवंतउभा एकटाच आज रस्त्यावरती 
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पुऱ्या होतील ह्या इमारती 
माझ्या सख्यांची करून मातीस्वप्न तुमची पुरी होणार होती 
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु 
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर 
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर 
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती 
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार 
मलाही वाटतेइथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात 
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि 
नित्यनेमाने तुम्ही स्वतःचे कापता केसतशाच कापता माझ्या पारंब्या 
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधून आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता 
आता वट पौर्णिमेला मला पुजायला कमी येतात त्या सुवासिनी 
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी 
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी 
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी 
नशीब माझेदेवाने योजना केली आहे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातील माझी फळे , विष्ठा टाकतील जमिनीवरइमारती वरती 
त्या इमारतीवर कुठेही रुजतील त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बियाआणि !
त्याच इमारतींवर उगवतील वडाची कोवळी रोपेवाढेल तो वट - वंशवेल
जणु सांगतील कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती 
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश 
तुमच्या आधी आमचाच होता  ह्या जमिनीवर पहिला हक्क 
जणु सूड उगवतील त्या इमारतींवरज्यांच्यामुळे मेले ते सारे वटवृक्ष  
त्या साऱ्या सूड नट्ट्यावर माझ्या एकाकी डोळ्यांचे आहे इथूनच लक्ष 
मी आहे वटवृक्ष एकटाच रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा  
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची 
सवय झाली आहे मला आता त्या वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश्श आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटानेगुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने 
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीतदुर्दम्य आशा ठेवुन आहे मी जगण्याची.

लेखक / कवी  - सुरेश पित्रे
पत्ता - " वैद्य सदन ", पहिला मजलाराघोबा शंकर रोड

चेंदणीठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१