II दूर माझा सुजलाम देश II
प्रेमळ माझे बाबा आई
तशीच माझी खट्याळ ताई
माणसे आपली दूर दूर
मनी माझ्या हीच हुर हुर II१II
रक्ताची नाती आपली
प्रेमाची देती सावली
आठवण त्यांची मनात भरली
प्रतिमा त्यांची उरात कोरली II२II
तुम्हाविना मज करमत नाही
काही मजला उमजत नाही
तुमची जर का साथ नाही
या पैशाची किंमत नाही II३II
पैसा पैसा आणि पैसा
याच्याविना कोण बोले कैसा
पाण्याविना का जगेल मासा ?
पैशाविना का जमेल माणसा ? II४II
काळा पांढरा अरबी झगा
म्हणती इथे शिस्तीत वागा
चकाचक रस्ते मॉल मस्त
नवीन गाड्या, पेट्रोल स्वस्त II५II
आज मी इथे उजाड परदेश
दूर माझा सुजलाम देश
इथली तप्त भूमी वाळवंट
दूर आप्त हीच मनी खंत II६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
No comments:
Post a Comment