नमस्कार ,
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही गोविंदा जखमी होणे , मरणे हे प्रकार झालेच आहेत त्यावर
आधारित गजल प्रकारातील हि कविता छापण्यासाठी देत आहे - सुरेश पित्रे
''गोविंद'' त्याला भेटेल का?
कायदा इथे आहे तरीही
डीजेंचा डणडणाट आहे
गोविंदा इथे जखमी तरीही
उत्सव हा जोमात आहे II१II
हात पाय मोडले तरीही
उत्सव जल्लोशात आहे
गोविंदा तो मरतो तरीही
होश इथे कोणाला आहे ? II२II
जीव मुलाचा जातो तरीहि
पैशाचा लोभ संपत नाही ?
पोटचा मुलगा मरतो तरीही
बाप विम्याचे हिशोब पाही? II३II
प्रेक्षक दुरून खेळ पाहतो
गोविंदा वरून पडतो आहे
सामान्य हा माणूस मरतो
समाज इथे नुसताच पाहे II४II
ह्यांचा एक दिवसाचा खेळ
दरवर्षी नित्त्य नेमेची आहे
आयुष्यभर हा भोगतो खेळ
गोविंदा जो जायबंदी आहे II५II
डोके फुटते तरीहि ह्यांच्या
डोक्यात शिरत नाही का ?
गोविंदा वर पोचला तरी
''गोविंद'' त्याला भेटेल का? II६II
डीजेचा डणडणाट तरीही
भजन कानात शिरले नाही
थंड पाण्यात नाहला तरी
खऱ्या भक्तीत भिजला नाही II७II
रंगात ह्या रंगला तरीही
रंग भक्तीचा कळला नाही
फुलांनी हंडी सजली तरीहि
भक्तीचा सुगंध कळला नाही II८II
डीजे तालावर नाचला तरी
कृष्णाचा ताल कळला नाही
दही हंडी उंच बांधली तरी
बुद्धीची उंची वाढली नाही II९II
भिंती ह्या हादरल्या तरीही
ध्वनीक्षेपक दणाणत आहे
कान पार किटले तरीही
डिस्को दणक्यात चालु आहे II१०II
कायदा इथे असला तरीहि
पाळणारे सभ्य कोण आहे ?
गोविंदाचा जीव गेला तरीही
जोर धन दांडग्यांचा आहे II११II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
No comments:
Post a Comment