Friday, December 19, 2014

II थोडेसे पैसे हे पुरवायचे तरी हो कसे ? II

II थोडेसे पैसे हे पुरवायचे तरी हो कसे II

नवरा म्हणे बायकोला हे जे थोडेसे आहेत पैसे
तुझ्यावर,मुलांवर,संसारावर खर्च करू गं कसे ?
चार आकडी पगाराचे कष्टाचे हे माझे पैसे
महिनाभर पुरतात मला संसाराला कसे बसे 
IIII
साडीसाठी बायकोचा हट्ट नेहमीच असे
माझेही वाक्य तेव्हा तोंडपाठच असे !
तूच सांग अगं ! प्रिये, लाडके , राजसें !
थोडेसे माझे पैसे अगं ! मी पुरवायचे कसे ? 
IIII
बायकोची मागणी हिरे घ्यांना मला इवलेसे
समजाविले मी हो तिला कसे नी बसे !
बायको म्हणते ! तुम्ही नेहमी असे हो कसे ?
कायमच कफल्लक ! रिकामे तुमचे खिसे 
IIII
देणेकऱ्यांचे पैसे मी द्यायचे तरी हो कसे ?
महिन्याचे कर्जाचे हप्ते मी फेडायचे हो कसे ?
संसाराचे खर्च किती, कुठे आणि कसे ?
एवढ्याशा पगारात मी पुरवायचे तरी कसे ? 
IIII
मुलाला डॉक्टर मी करायचे तरी हो कसे ?
मुलीला इंजिनीअर मी करायचे हो कसे ?
महागाईला तोंड मी द्यायचे तरी कसे ?
वाढत जाणारे खर्च भागवायचे हो कसे ? 
IIII

नवे मोठे घर मी विकत घ्यायचे तरी हो कसे ?
मुलीचे लग्न आता मी लावायचे हो कसे ?
क्रेडीट कार्डचे पैसे काहीजण भरतात हो कसे ?
कष्टाचे थोडेसे पैसे मी पुरवायचे हो कसे ? 
IIII
अहो पैसे पैसे पैसे ! तुमचे आमचे जनतेचे पैसे !
काही भ्रष्टाचारी लोकांनी खूप खाल्ले ना पैसे ?
वर्षानुवर्ष त्याच योजनांवर खर्चहि झाले पैसे
उपाय नाही म्हणून वाया गेले कष्टाचे पैसे ! 
IIII
एक हजारांची नोकरी करतात कष्टकरी माणसे
जीव टांगणीला टाकत प्रवास करतात कसेबसे ?
भ्रष्टाचारी लोकांना हे सारे दिसणार तरी कसे ?
भ्रष्टाचारी बोके सारे, डोळे मिटून दुध पितात जसे 
IIII
कोणी म्हणे ! परदेशी बँकेत आहेत, करोडो भारतीय पैसे !
लोकं बोंब मारतात, भारतात परत आणा हे जनतेचे पैसे
मग कोणालाच कमी पडणार नाहीत हो खर्चाला पैसे !
प्रश्नच पडणार नाही, थोडेसे पैसे पुरवायचे तरी
 कसे ? IIII
लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           
Email ID - kharichavata@gmail.com

No comments:

Post a Comment