Wednesday, December 14, 2011

निसर्ग देतो एकच दणका



|| निसर्ग देतो एकच दणका ||


 निसर्ग अजून उदार आहे 
 जीवन सृष्टीला आधार आहे 
 मानवा किती तू लुटणार आहे?
 किती वृक्ष तू तोडणार आहे? ||१||
श्वास तूच ना घेणार आहे 
`प्राणवायु वृक्ष देणार आहे 
झाड का तू तोडणार आहे 
जणू स्वतःस तू मारणार आहे ||२||
 सिमेंटचे जंगल भरपूर आहे 
 गाड्यांचा विषारी धूर आहे 
 झाडे तोडण्याचा सूर आहे 
 माणूस किती मग्रूर आहे ||३||
निसर्गास  तो शोषत आहे 
प्रदूषण ते  विस्तारत आहे 
मनुष्य  बेदरकार  आहे 
म्हणे  मीच  शूर  आहे ||४||
 त्सुनामीचा एक फटका 
 भूकंपाचा  एकच धक्का 
 वादळाचा  एक  तडाखा  
 निसर्ग देतो एकच दणका ||५||

कवी / प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता - "वैद्य सदन ", पहिला मजला,
राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी,    
ठाणे (पश्चिम) ,पिन कोड क्र.-४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९        
(c/o) - 
०२२ - २५३२६४२९        
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - 
kavisureshpitre@gmail.com