नमस्कार ,
गोरक्षण आणि संवर्धन हे आज संपूर्ण जगासाठी अत्त्यंत आवश्यक आहे , ह्याचा प्रचार प्रसार लवकर आणि सर्वत्र
होणे आज गरजेचे आहे , प्रसार माध्यमांनी ह्याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे , ह्या ध्वनी चित्रफिती मध्ये
अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरानी ह्यावर संशोधन केले आहे त्याची माहिती दिली आहे , हे पाहून ऐकून
आता आपल्यालाही पटेल कि शेती प्रधान संस्कृतीच जगाला खरे सुख आणि समाधान देऊ शकते
कारण विचार केला तर लक्षात येईल कि माणसाला गाडी , बंगला हि साधने कधी सुख देतील
जेव्हा माणसाचे शरीर स्वस्थ असेल आणि ते स्वस्थ राहण्यासाठी शुद्ध अन्न,पाणी हवा फक्त आणि फक्त हेच
उपयोगी आहे , आणि ह्या तिन्ही गोष्टी आज प्रदूषित झाल्या आहेत , मग कसे आरोग्य शांती सुख लाभेल?
म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी आज समाजाची अवस्था आहे ,
समाजात रोग , अशांती आणि दुःख दूर करण्याची समाजाची इच्छा आहे आणि त्याला उपाय एकमेव आहे
तो म्हणजे शेती प्रधान भारतीय संस्कृती आणि गोरक्षण गोसंवर्धन. ह्याला फक्त धार्मिक अंक किंवा रंग कोणी
देऊ नये आणि ह्याचे महत्व सर्व जगाला पटवून देणे गरजेचे आहे , तेव्हाच संपूर्ण गोहत्त्या यशस्वी होऊ शकते
आणि संशोधनांती असे इथे म्हटले आहे कि भारतीय गोवंशच ह्यासाठी उपयोगी आहे, भारतात एकूण १०८ जाती
होत्या , ब्राझील देशात त्या नेल्या गेल्या आणि सांभाळल्या गेल्या असेहि दुसऱ्या मराठी चित्रफितीत माहिती दिली आहे
ह्या विषयाला लवकरात लवकर प्रसिद्धी प्रत्येक प्रसर माध्यमाने देणे अति आवश्यक आहे,
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
No comments:
Post a Comment