Saturday, December 20, 2014

अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे.

अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे. 
१० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन आहे. 
खरे म्हणजे आपल्या ऋषी मुनींच्या संस्कृतीला अनुसरून विचार केला तर माणसाच्या मुलभूत गरजा आणि त्या मिळण्याचा 
अधिकार हा प्रत्येक मानवाला आहे , आणि त्याला सर्व जगाने प्राधान्य दिले गेले पाहिजे , पण आज असे चित्र दिसत नाही 
आज २०-३० टक्के जनता ज्या सुख सुविधा उपभोगते त्या उरलेले ७०-८० टक्के सामान्य माणसाला मिळत नाहीत 
पण ते एका अर्थी चांगलेच आहे कारण हा जो 30 टक्के समाज जे सुख समजतो ते खरे सुख नसतेच हे जेव्हा माणूस 
आजारी पडतो तेव्हा त्याला कळते , आजारी पडल्यावर माणसाला विचारा तुला हिऱ्याची अंगठी हवी ,आलिशान गाडी 
एटीएम मशीन , विमान प्रवास , ३० व्या मजल्यावर घर इत्त्यादी हवे का ? 
तो म्हणेल नको मला आधी आजारातून बरे होउदे , आणि हेच मुख्य तत्व आपल्या ऋषी मुनींनी सांगितले आहे 
कि शरीराच्या गरजा कमीत कमी ठेवा म्हणजे सर्व समाज आणि जग सुखी होईल , आणि आज तेच दिसते आहे 
मुलभूत गरजा शुद्ध स्वरुपात जपण्याचे सोडून अन्य चंगळ वादाच्या , उपभोगाच्या 
वस्तूच्या गरजा माणसाने वाढवून ठेवल्या आहेत त्यामुळेच आज प्रदूषणाचा विळखा जगाला पडला आहे 
आणि त्यात माणसाचे मरण होत आहे तरी तो आज सुधारायला तयार नाही , त्यामुळे माणसाच्या मुलभूत 
गरजा शुद्ध पाणी , हवा आणि अन्न हेच आज अशुद्ध प्रदूषित झाले आहे , शरीर ठीक राहिले तर ह्या वरच्या गोष्टी 
माणूस उपभोगणार , हे लंगोटी लावून जीवन जगणाऱ्या लोकांना चांगले कळू शकते , ह्याचा अनुभव मी स्वतः नर्मदा 
परिक्रमा करताना घेतला तेव्हा १०० टक्के पटते . तिकडे अजून माणुसकी जिवंत आहे , कोणी असे म्हणत नाही हि जमीन 
माझी वगैरे , ते म्हणतात जमीन देवाची , पाणी देवाचे , ऊन देवाचे मी फक्त शेतात राबतो हजार दाणे पेरतो आणि मग 
देव लाखो दाणे निर्माण करतो , मग त्यावर माझा अधिकार कसा ? म्हणून तिथे सर्वाना अन्न दान मोफत 
केले जाते , पण ह्या तिकडे टिकलेल्या आपल्या विचाराच्या संस्कृतीवरहि आता धरणे बांधून हल्ला होऊ पाहतो आहे 
धरणे बांधून नदीचे पाणी सरकार अडवणार , विकणार . आणि मग ह्याची सत्ता कोणाकडे ह्यासाठी लढाया,
हे कोण करतय तर जागतिक बँक (अमेरिका इत्त्यादी देश )
देवाला विकत घ्यायला आणि विकायला निघालेत असे म्हणणे योग्य ठरेल कारण आपली संस्कृती सर्वा भूती परमेश्वर मानते   
पाणी म्हणजे , नदी म्हणजे आपण देवता मानतो. शांतीचा मार्ग सोडून अशांतीच्या मार्गावर जग चालले आहे. 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

No comments:

Post a Comment