II प्रदूषण आणि दुष्काळ II
जेव्हा झाली प्रगती मानवाची
तेव्हा वाढली रेलचेल यंत्रांची
वाढ झाली इथे कारखान्यांची
निर्मिती झाली जगांत शहरांची II१II
शहरांत झाली गर्दी खेडुतांची
बजबजपुरी झाली सर्व शहरांची
कारखान्यांना गरज भासली इंधनाची
गरज पूर्तीसाठी केली झाडतोडी II२II
नष्ट झाली शोभा जगांत निसर्गाची
झाली मरुभूमी या नंदनवनाची
डोंगर उजाड, नांदी हि वाळवंटाची
झाली वाढ भयंकर तापमानाची II३II
झाली घट अतिशय पर्जन्यमानाची
पातळी वाढली धूर, धूळ, प्रदूषणाची
खेडेगावात शेतीला टंचाई पाण्याची
शेतकऱ्याला लागली झळ दुष्काळाची II४II
कृषिप्रधान देशाला कमतरता धान्याची
दारिद्र्य रेषेखाली उपासमार जनतेची
तरुणांवर वेळ आली बेरोजगारीची
झाली उन्हाने लाही लाही शहरवासियांची II५II
विजेची टंचाई, सक्ती भार नियमनाची
तज्ञांची ओरड, झाली हानी निसर्गाची
वेळ आली आता रोपे लावण्याची
झाडे वाढविण्याची,पर्यावरण जपण्याची II६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
No comments:
Post a Comment