Friday, December 19, 2014

परम आत्म्याचा बोध घ्यावा

परम आत्म्याचा बोध घ्यावा 

जीवन एक अनमोल ठेवा 
फुलाचा मंद सुगंध हुंगावा 
पक्षांचा किलबिलाट ऐकावा  
प्रसन्न छान सूर्योदय पहावा

निसर्गगंध छातीत भरावा 
छान फुलांचा गुच्छ पहावा 
पानावर दवाचा थेंब पहावा 
थेंब गार हातावर घ्यावा 

भिरभिरणारा चतुर पहावा 
सळसळनारा साप पहावा 
गाईचा हंबरडा ऐकावा 
निसर्ग पुन्हा पुन्हा बघावा 

पांढराशुभ्र नितळ हंस पहावा 
झऱ्यांचा खळखळाट ऐकावा 
शांत पाण्यात तरंग पहावा 
रौद्र कोसळता धबधबा पहावा 

जणू गालीचा गार गर्द हिरवा
राकट कणखर दगड पहावा 
दगडात एक आकार शोधावा 
भारदस्त छातीचा पहाड पहावा  

अथांग निळाशार समुद्र पहावा 
अस्ताचा लालबुंद सूर्य पहावा 
शांत शीतल निर्मळ चंद्र पहावा 
प्रदीर्घ मोठ्ठा श्वास घ्यावा 

जीवनानुभव प्रत्यक्ष घ्यावा 
हृदयाचा ठोका ऐकावा  
एक मोठ्ठा सुस्कारा द्यावा 
परम आत्म्याचा बोध घ्यावा 

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

गोरक्षण आणि संवर्धन - protect save indian cow

नमस्कार ,
गोरक्षण आणि संवर्धन हे आज संपूर्ण जगासाठी अत्त्यंत आवश्यक आहे , ह्याचा प्रचार प्रसार लवकर आणि सर्वत्र 
होणे आज गरजेचे आहे , प्रसार माध्यमांनी ह्याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे , ह्या ध्वनी चित्रफिती मध्ये 
अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरानी ह्यावर संशोधन केले आहे त्याची माहिती दिली आहे , हे पाहून ऐकून 
आता आपल्यालाही पटेल कि शेती प्रधान संस्कृतीच जगाला खरे सुख आणि समाधान देऊ शकते 
कारण विचार केला तर लक्षात येईल कि माणसाला गाडी , बंगला हि साधने कधी सुख देतील 
जेव्हा माणसाचे शरीर स्वस्थ असेल आणि ते स्वस्थ राहण्यासाठी शुद्ध अन्न,पाणी हवा फक्त आणि फक्त हेच 
उपयोगी आहे , आणि ह्या तिन्ही गोष्टी आज प्रदूषित झाल्या आहेत , मग कसे आरोग्य शांती सुख लाभेल?
म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी आज समाजाची अवस्था आहे , 
समाजात रोग , अशांती आणि दुःख दूर करण्याची समाजाची इच्छा आहे आणि त्याला उपाय एकमेव आहे 
तो म्हणजे शेती प्रधान भारतीय संस्कृती आणि गोरक्षण गोसंवर्धन. ह्याला फक्त धार्मिक अंक किंवा रंग कोणी 
देऊ नये आणि ह्याचे महत्व सर्व जगाला पटवून देणे गरजेचे आहे , तेव्हाच संपूर्ण गोहत्त्या यशस्वी होऊ शकते 
आणि संशोधनांती असे इथे म्हटले आहे कि भारतीय गोवंशच ह्यासाठी उपयोगी आहे, भारतात एकूण १०८ जाती 
होत्या , ब्राझील देशात त्या नेल्या गेल्या आणि सांभाळल्या गेल्या असेहि दुसऱ्या मराठी चित्रफितीत माहिती दिली आहे 
ह्या विषयाला लवकरात लवकर प्रसिद्धी प्रत्येक प्रसर माध्यमाने देणे अति आवश्यक आहे,

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

II पश्चाताप II

II पश्चाताप II 

खेड्यातून आला , शहरात रमला 
अंगवळणी पडला, शहराचा थाट रे 

इथेच राहिला , रडत खडत जगला 
माणसाने भोगला, शहराचा ताप रे 

धुराने घुसमटला, धुळीने गुदमरला 
काजळीने काळा झाला, छातीचा भाता रे 

खोकल्याने हबकला, धापेने थकला 
खाली वर झाला , माणसाचा जीव रे 

उपभोग वादाला, चंगळ वादाला 
प्लास्टीक पिशवीला, सरावला तूच रे 

वायु प्रदूषणाला, ध्वनी प्रदूषणाला 
जल प्रदूषणाला , कारण तूच रे 

संयम सोडला , परिणाम भोगला 
तूच रे दाबला , गळा तुझाच रे 

प्राण कंठी आला, पश्चाताप झाला 
प्राण तुझा गेला, हाय रे हाय रे 


लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

II कवीचे काव्य II

II कवीचे काव्य II

कवीचे काव्य म्हणजे विलक्षण असते ,
एखाद्या गोष्टीचे आंतरबाह्य निरीक्षण असते,
शब्दांना चढलेले एक दिव्य स्फुरण असते,
उपमा आणि अलंकारांनी नटलेले विवरण असते.II१II

कवीचे काव्य म्हणजे नुसती कविताच नसते,
न्यायाधीश बनून दाखविलेली समताच असते 
न्यायाचे पारडे इथे समानच असते ,
कवीला कोणी आपले किंवा परके नसते. II२II

कवीच्या मनात असते सचोटी ,
शब्द गुंफण्याची असते हातोटी,
म्हणूनच नाठाळाच्या माथी ,
हाणू शकतो शब्दांची काठी . II३II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

Tuesday, August 19, 2014

GOVINDA KAVITA GAJAL

नमस्कार ,
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही गोविंदा जखमी होणे , मरणे हे प्रकार झालेच आहेत त्यावर 
आधारित गजल प्रकारातील हि कविता छापण्यासाठी देत आहे - सुरेश पित्रे 

''गोविंद'' त्याला भेटेल का? 

कायदा इथे आहे तरीही   
डीजेंचा डणडणाट आहे 
गोविंदा इथे जखमी तरीही 
उत्सव हा जोमात आहे II१II

हात पाय मोडले तरीही 
उत्सव जल्लोशात आहे 
गोविंदा तो मरतो तरीही 
होश इथे कोणाला आहे ? II२II

जीव मुलाचा जातो तरीहि 
पैशाचा लोभ संपत नाही ?
पोटचा मुलगा मरतो तरीही 
बाप विम्याचे हिशोब पाही? II३II

प्रेक्षक दुरून खेळ पाहतो  
गोविंदा वरून पडतो आहे
सामान्य हा माणूस मरतो
समाज इथे नुसताच पाहे II४II

ह्यांचा एक दिवसाचा खेळ 
दरवर्षी नित्त्य नेमेची आहे 
आयुष्यभर हा भोगतो खेळ 
गोविंदा जो जायबंदी आहे II५II

डोके फुटते तरीहि ह्यांच्या  
डोक्यात शिरत नाही का ? 
गोविंदा वर पोचला तरी 
''गोविंद'' त्याला भेटेल का? II६II

डीजेचा डणडणाट तरीही 
भजन कानात शिरले नाही  
थंड पाण्यात नाहला तरी 
खऱ्या भक्तीत भिजला नाही II७II

रंगात ह्या रंगला तरीही
रंग भक्तीचा कळला नाही 
फुलांनी हंडी सजली तरीहि 
भक्तीचा सुगंध कळला नाही II८II

डीजे तालावर नाचला तरी 
कृष्णाचा ताल कळला नाही  
दही हंडी उंच बांधली तरी
बुद्धीची उंची वाढली नाही II९II

भिंती ह्या हादरल्या तरीही 
ध्वनीक्षेपक दणाणत आहे 
कान पार किटले तरीही 
डिस्को दणक्यात चालु आहे II१०II

कायदा इथे असला तरीहि 
पाळणारे सभ्य कोण आहे ?
गोविंदाचा जीव गेला तरीही 
जोर धन दांडग्यांचा आहे II११II

लेखक / कवी  - सुरेश पित्रे.

Saturday, August 2, 2014

कविता - नैसर्गिक आपदा

नमस्कार ,
माळीण गावात दरड कोसळून पूर्ण गावच गाडले गेले 
हि अत्त्यंत वाईट घटना घडली ती शब्दबद्ध करून 
लिहिलेली कविता ,

  II नैसर्गिक आपदा II

पाऊस धो धो पडला 
डोंगर तो धसला 
भसा भस कोसळला 
चिखल खाली वाहला II१II

गाढ होते सगळे  
गाव ते हो झोपले 
घास करुनी गावाचा 
भूमीने तो गिळला II२II

माळीण गांव भूमीत 
गेले कसे ते गाडले ?
फक्त नाव शिल्लक  
सारे भूमीत संपले II३II

निसर्गाचा कोप हा 
गावावर जाहला 
शेकड्यावरी मृतांचा 
आकडा तो पोचला II४II

किती रे तोडशील 
वृक्ष झाडे संपदा ?
किती रे सोसशील   
निसर्गाची आपदा II५II

संसार होता थाटला  
दैवाने हा उधळला 
जीवनाचा डाव हा 
क्षणात काही संपला II६II

महाभूताने क्षणात  
कार्यभाग साधला 
पाहुनी ते दृश्य सारे 
जमाव सुन्न जाहला II७II

दुःखाचा रंग हा    
आसमंती दाटला 
जन सागर इथे हा
मदतीस धावला  II८II

प्रगतीच्या ह्या भरात 
माणूस का विसरतो ? 
निसर्गास नित्य आपण 
किती किती शोषतो II९II

माणसाचा जीव आज 
किती क्षुद्र जाहला 
मदतीचा आकडा तो 
काही लाखात मोजला II१०II

लेखक / कवी - सुरेश पित्रे.

पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           

Monday, July 28, 2014

II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II

            II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II
                     पेट्रोल डीझेल हे संपत आले 
                    शास्त्रज्ञ पर्याय शोधु लागले 
                   विज्ञानाने अनेक शोध लावले  
                   महाजालावर खुप पहावे IIII

                     सूर्यउर्जेवर चालणारी गाडी आहे 
                    शहरासाठी तर मस्तच आहे 
                   सूर्य उर्जेवर बॅटरी चार्ज होते 
                        बॅटरीवर गाडी छान धावते IIII

जपानमधे गाडी तयार आहे
चीन,
जर्मनीत रस्त्यावर आहे
भारत सरकार उदासीन आहे
मुंबई तर गाढ झोपली आहे
IIII

चार चाकी किंवा तीन चाकी
एक आसनी, हलकी फुलकी
गाडीला पेट्रोलची गरज नाही
वाहू शकते हि सामानहि
 IIII

इंधनाचा मस्त पर्याय आहे 
पर्यावरणाला न्याय देत आहे 
गाडीला डिझेलची गरज नाही 
पार्किंगला जागा अर्धीच घेई IIII

घुर घुर आवाज होत नाही
ध्वनी प्रदूषणाचा त्रास नाही
धूर अजिबात येतच नाही
वायु प्रदूषणाचा प्रश्नच नाही
 IIII

बायोगॅस प्लांट छान चालतो 
शहरातही हा वापरता येतो 
ओला कचरा बारीक करावा 
द्रवरूप करून ह्यात टाकावा IIII

शहरात कचरा होणार नाही 
दुर्गंध मुळीच येणार नाही 
बायोगॅस प्लांट सोपा वापरा
द्रवरूप कचरा संडासात सोडावा IIII

छोट्या कुटुंबाला गॅस पुरतो 
द्रवरूप कचरा खतही देतो 
डम्पिंग मैदानाचा प्रश्न मिटतो 
सर्वांना मोकळा श्वास मिळतो IIII

सूर्य उर्जेचा एक संच मिळतो 
तंत्रज्ञ येऊन बसवून देतो 
किंवा आपणही शिकू शकतो 
रात्री छान प्रकाश मिळतो II१०II

महाजालावर सर्व उपलब्ध आहे 
पर्यायी यंत्र तंत्र वाहन तयार आहे 
पण समाज नुसते पाहतो आहे 
प्रदूषणाचे धक्के सोसतो आहे II११II

पेट्रोल वाहनांवर आणावी बंदी 
विजेच्या वाहनांची करावी सक्ती 
समाजाने जोरदार मागणी करावी 
चार्जींग स्टेशन्स उभी करावी II१२II
-- कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- "वैद्य सदन", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी,ठाणे (पश्चिम) ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ , Email ID - kharichavata@gmail.com