Monday, July 28, 2014

II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II

            II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II
                     पेट्रोल डीझेल हे संपत आले 
                    शास्त्रज्ञ पर्याय शोधु लागले 
                   विज्ञानाने अनेक शोध लावले  
                   महाजालावर खुप पहावे II१II

                     सूर्यउर्जेवर चालणारी गाडी आहे 
                    शहरासाठी तर मस्तच आहे 
                   सूर्य उर्जेवर बॅटरी चार्ज होते 
                        बॅटरीवर गाडी छान धावते II२II

जपानमधे गाडी तयार आहे
चीन,
जर्मनीत रस्त्यावर आहे
भारत सरकार उदासीन आहे
मुंबई तर गाढ झोपली आहे
II३II

चार चाकी किंवा तीन चाकी
एक आसनी, हलकी फुलकी
गाडीला पेट्रोलची गरज नाही
वाहू शकते हि सामानहि
 II४II

इंधनाचा मस्त पर्याय आहे 
पर्यावरणाला न्याय देत आहे 
गाडीला डिझेलची गरज नाही 
पार्किंगला जागा अर्धीच घेई II५II

घुर घुर आवाज होत नाही
ध्वनी प्रदूषणाचा त्रास नाही
धूर अजिबात येतच नाही
वायु प्रदूषणाचा प्रश्नच नाही
 II६II

बायोगॅस प्लांट छान चालतो 
शहरातही हा वापरता येतो 
ओला कचरा बारीक करावा 
द्रवरूप करून ह्यात टाकावा II७II

शहरात कचरा होणार नाही 
दुर्गंध मुळीच येणार नाही 
बायोगॅस प्लांट सोपा वापरा
द्रवरूप कचरा संडासात सोडावा II८II

छोट्या कुटुंबाला गॅस पुरतो 
द्रवरूप कचरा खतही देतो 
डम्पिंग मैदानाचा प्रश्न मिटतो 
सर्वांना मोकळा श्वास मिळतो II९II

सूर्य उर्जेचा एक संच मिळतो 
तंत्रज्ञ येऊन बसवून देतो 
किंवा आपणही शिकू शकतो 
रात्री छान प्रकाश मिळतो II१०II

महाजालावर सर्व उपलब्ध आहे 
पर्यायी यंत्र तंत्र वाहन तयार आहे 
पण समाज नुसते पाहतो आहे 
प्रदूषणाचे धक्के सोसतो आहे II११II

पेट्रोल वाहनांवर आणावी बंदी 
विजेच्या वाहनांची करावी सक्ती 
समाजाने जोरदार मागणी करावी 
चार्जींग स्टेशन्स उभी करावी II१२II
-- कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- "वैद्य सदन", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी,ठाणे (पश्चिम) ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ , Email ID - kharichavata@gmail.com

No comments:

Post a Comment