पर्जन्यदेवा का रे रुसलास ?
अरे पावसा पावसा, का रे रुसलास आता ?
वाट पाहूनि तूझी, शेतकरी हा रे थकला
तू येणार म्हणुनी, नांगर चालविला होता
कोवळा अंकुर भुईत, पाण्याविना सुकून गेला ||१||
शेतक-याला एक, आशेचा किरण होता
सरलेल्या ढगामधे, आशेचा किरण विरला
आभाळ भरलें होते, अंधार दाटला होता
भरलेल्या ढगांना, वारा दूर घेऊन गेला ||२||
चोच उघडूनी इथे, चातक बसला होता
तहानलेला चातक, वाट पहात बसला
शेतकरी कर्जामधे, आहे डूबला पुरता
तोंड दावूनी नुसते, पाऊस पळून गेला ||३||
कर्ज फेडता फेडता, दमछाक झाली आता
पहा पाऊस पाऊस, किती निर्दयी झाला
शेतकरी म्हणतो आहे,कोणाकडे पाहू आता
वरुण राजाच स्वये, पाठ तो दावून गेला ||४||
हप्त्यासाठी एकच वेळ, शेतकरी जेवत होता
आता पोटाला त्याच्या, पुरता चिमटा बसला
शेते कोरडी पडली, जमिनीला पडला तडा
महागाई जाऊन भिडली, सर्वत्र गगनाला ||५||
विहिरीला नाही पाणी, अंगणात नाही सडा
आधीच दुष्काळ होता, त्यात तेरावा आला
गुरेढोरे तहानली ती, घसा पडला कोरडा
पक्षांना दाणा नाही, पर्जन्यदेवा का रे रुसलास ||६||
हजारो लाखो कोटी, मदत होईल जाहीर आता
तरी प्यायला पाणी नाही, शेतकरी आहे भूकेला
पाठ फिरवू नकोस तू , थोडा तरी बरस आता
धरणात या पाऊस पडूदे, प्रार्थना माझी देवाला ||७||
मुंबईतला माणूस तोही, चिंतातूर बसला
शहरवासी तोही थकला, घाम गळुनी आता
लोकल मधे लटकून, महागाईने त्रस्त झाला
तलाव गेले खोल, पाण्याची पडली चिंता ||८||
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
No comments:
Post a Comment