Monday, July 28, 2014

II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II

            II विज्ञान आणि पर्यावरण रक्षण II
                     पेट्रोल डीझेल हे संपत आले 
                    शास्त्रज्ञ पर्याय शोधु लागले 
                   विज्ञानाने अनेक शोध लावले  
                   महाजालावर खुप पहावे IIII

                     सूर्यउर्जेवर चालणारी गाडी आहे 
                    शहरासाठी तर मस्तच आहे 
                   सूर्य उर्जेवर बॅटरी चार्ज होते 
                        बॅटरीवर गाडी छान धावते IIII

जपानमधे गाडी तयार आहे
चीन,
जर्मनीत रस्त्यावर आहे
भारत सरकार उदासीन आहे
मुंबई तर गाढ झोपली आहे
IIII

चार चाकी किंवा तीन चाकी
एक आसनी, हलकी फुलकी
गाडीला पेट्रोलची गरज नाही
वाहू शकते हि सामानहि
 IIII

इंधनाचा मस्त पर्याय आहे 
पर्यावरणाला न्याय देत आहे 
गाडीला डिझेलची गरज नाही 
पार्किंगला जागा अर्धीच घेई IIII

घुर घुर आवाज होत नाही
ध्वनी प्रदूषणाचा त्रास नाही
धूर अजिबात येतच नाही
वायु प्रदूषणाचा प्रश्नच नाही
 IIII

बायोगॅस प्लांट छान चालतो 
शहरातही हा वापरता येतो 
ओला कचरा बारीक करावा 
द्रवरूप करून ह्यात टाकावा IIII

शहरात कचरा होणार नाही 
दुर्गंध मुळीच येणार नाही 
बायोगॅस प्लांट सोपा वापरा
द्रवरूप कचरा संडासात सोडावा IIII

छोट्या कुटुंबाला गॅस पुरतो 
द्रवरूप कचरा खतही देतो 
डम्पिंग मैदानाचा प्रश्न मिटतो 
सर्वांना मोकळा श्वास मिळतो IIII

सूर्य उर्जेचा एक संच मिळतो 
तंत्रज्ञ येऊन बसवून देतो 
किंवा आपणही शिकू शकतो 
रात्री छान प्रकाश मिळतो II१०II

महाजालावर सर्व उपलब्ध आहे 
पर्यायी यंत्र तंत्र वाहन तयार आहे 
पण समाज नुसते पाहतो आहे 
प्रदूषणाचे धक्के सोसतो आहे II११II

पेट्रोल वाहनांवर आणावी बंदी 
विजेच्या वाहनांची करावी सक्ती 
समाजाने जोरदार मागणी करावी 
चार्जींग स्टेशन्स उभी करावी II१२II
-- कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- "वैद्य सदन", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी,ठाणे (पश्चिम) ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ , Email ID - kharichavata@gmail.com

NARMADA PARIKRAMA 2014

नर्मदे हर ! हर हर नर्मदे !
NARMADA PARIKRAMA (PRADAKSHINA) 2014 श्री नर्मदा परिक्रमा (प्रदक्षिणा) २०१४ श्री दत्त अवतार परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी ( श्री महाराजांचे जन्मगाव माणगाव, महाराष्ट्र आणि समाधीस्थळ श्री क्षेत्र गरुडेश्वर, मध्य प्रदेश ) ह्यांचा समाधी शताब्दी महोत्सव श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे वर्षभर चालु होता , समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त माझी अशी इच्छा होती कि श्री महाराजांनी त्यांच्या परीक्रमेच्या वेळी जिथे चातुर्मास केला आणि नर्मदा नदी किनारीच अन्य ठिकाणीही त्यांची काही स्मृति स्थळे आहेत तिथे समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त जावे , ती माझी इच्छा नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने श्री नर्मदा मैयाच्या / देवीच्या आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. - सुरेश पित्रे , ठाणे. , SURESH PITRE,THANE


पर्जन्यदेवा का रे रुसला ?
अरे पावसा पावसा, का रे रुसलास आता ?
वाट पाहूनि तूझी, शेतकरी हा रे थकला 
तू येणार म्हणुनी, नांगर चालविला होता 
कोवळा अंकुर भुईत, पाण्याविना सुकून गेला ||१||
शेतक-याला एक, आशेचा किरण होता 
सरलेल्या ढगामधे, आशेचा किरण विरला
आभाळ भरलें होते, अंधार दाटला होता
भरलेल्या ढगांना, वारा दूर घेऊन गेला ||२||
चोच उघडूनी इथे, चातक बसला होता 
तहानलेला चातक, वाट पहात बसला 
शेतकरी कर्जामधे, आहे डूबला पुरता 
तोंड दावूनी नुसते, पाऊस पळून गेला ||३||
कर्ज फेडता फेडता, दमछाक झाली आता 
पहा पाऊस पाऊस, किती निर्दयी झाला
शेतकरी म्हणतो आहे,कोणाकडे पाहू आता 
वरुण राजाच स्वये, पाठ तो दावून गेला ||४||
हप्त्यासाठी एकच वेळ, शेतकरी जेवत होता 
आता पोटाला त्याच्या, पुरता चिमटा बसला 
शेते कोरडी पडली, जमिनीला पडला तडा 
महागाई जाऊन भिडली, सर्वत्र गगनाला ||५||
विहिरीला नाही पाणी, अंगणात नाही सडा
आधीच दुष्काळ होता, त्यात तेरावा आला
गुरेढोरे तहानली ती, घसा पडला कोरडा 
पक्षांना दाणा नाही, पर्जन्यदेवा का रे रुसलास ||६||
हजारो लाखो कोटी, मदत होईल जाहीर आता
तरी प्यायला पाणी नाही, शेतकरी आहे भूकेला
पाठ फिरवू नकोस तू , थोडा तरी बरस आता 
धरणात या पाऊस पडूदे, प्रार्थना माझी देवाला ||७||
मुंबईतला माणूस तोही, चिंतातूर बसला 
शहरवासी तोही थकला, घाम गळुनी आता 
लोकल मधे लटकून, महागाईने त्रस्त झाला 
तलाव गेले खोल, पाण्याची पडली चिंता ||८||
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९