Friday, March 10, 2017
नमस्कार ,
शहरात कचऱ्याची समस्या खूप वाढली आहे , आणि जुनी घरे / झाडे जाऊन
तिथे उंच इमारती उभ्या राहिल्या , तर एक फोटो महाजालावर पाहिला
त्याला अनुसरून एक कविता लिहिली आहे , जी फोटोबरोबर छापली तर
शहरातील सर्वजण हि नामी कल्पना अमलात आणून आपली निसर्गाशी
तुटलेली नाळ पुन्हा जोडायचा प्रयत्न करतील . फोटो मी काढलेला नाही
त्यामुळे तो छापण्यासाठी परवानगी आहे कि नाही ते तुम्ही तपासावे ,
पण ज्याने ह्या छान कल्पनेचा फोटो काढला आहे त्यालाच अनुसरून मी कविता
लिहिली आहे , त्यामुळे त्यांचा फोटो छापण्यासाठी आक्षेप नसावा.
।। पक्षांना दे करवंटीचे घरटे ।।
माणसा तू जिथे तिथेच होते
त्या झाडावर त्यांचे घरटे
झाडही गेले घरही गेले
उभारली इमारत ऊंच इथे
फुकट जाते कचऱ्यात मिळते
त्यात पक्षांचे घर वसते
फेकू नका कचऱ्यात करवंटी
त्यात होतील पक्षांची घरटी
बांधून ठेवा ऊंच ठिकाणी
मजेत ऐका पक्षांची गाणी
आधुनिक जीवन प्रगती करते
निसर्गाशी तुटले आपुले नाते
ना तरी फुकट कचऱ्यात जाते
निसर्ग देतो फुकट तुला ते
इतकीच मानवा विनंती येथे
पक्षांना दे करवंटीचे घरटे
पक्षांची किलबिल कानी पडते
नाळ पुन्हा निसर्गाशी जुळते
फुलेल त्यांचा संसार इथे
पक्षांना दे करवंटीचे घरटे
कवी - सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे
Tuesday, May 19, 2015
मी आहे वटवृक्ष एकटाच !
नमस्कार
वट पौर्णिमा जवळ आली आहे , गुगलवर शोधले तर वट पौर्णिमेची तारीख वेगवेगळी सापडते ,
त्या निमित्त एक गद्दकाव्य लिहिले आहे,
अगदी मुंबईच्या सरहद्दीवर ठाणे शहरात शिरताना, (आतल्या रस्त्याला ) कोपरी गाव
लागते तिथे पूर्वी सर्व जंगल होते , आता तिथे मुंबई हद्दीत खाडी किनारी हरी ॐ नगर हि मोठी वसाहत
उभी राहिली आहे , त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर
अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही तो वटवृक्ष उभा आहे , तिथून नेहमी जाता येताना
मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे , आणि आता वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडल्या जातील तेव्हा जणूकाही
तोच वटवृक्ष त्याची कथा सांगतो आहे अशा रीतीने हे गद्दकाव्य लिहिले आहे.
शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही कदाचित ह्याच भावना असतील नाही का ?
- सुरेश पित्रे , ठाणे
मी आहे वटवृक्ष एकटाच !
वट पौर्णिमेसाठी माणूस आला वडाजवळ फांद्या तोडायला
पण वड लागला बोलायला आणि सांगु लागला त्या माणसाला
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय
होते इथे जंगल, माझ्या सभोवती सखे,सोयरे, माझे सोबती
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती
सुदैव माझं मी राहलो जिवंत, उभा एकटाच आज रस्त्यावरती
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पुऱ्या होतील ह्या इमारती
माझ्या सख्यांची करून माती, स्वप्न तुमची पुरी होणार होती
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार
मलाही वाटते, इथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि
नित्यनेमाने तुम्ही स्वतःचे कापता केस, तशाच कापता माझ्या पारंब्या
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधून आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता
आता वट पौर्णिमेला मला पुजायला कमी येतात त्या सुवासिनी
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी
नशीब माझे, देवाने योजना केली आहे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातील माझी फळे , विष्ठा टाकतील जमिनीवर, इमारती वरती
त्या इमारतीवर कुठेही रुजतील त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बिया, आणि !
त्याच इमारतींवर उगवतील वडाची कोवळी रोपे, वाढेल तो वट - वंशवेल
जणु सांगतील कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश
तुमच्या आधी आमचाच होता ह्या जमिनीवर पहिला हक्क
जणु सूड उगवतील त्या इमारतींवर, ज्यांच्यामुळे मेले ते सारे वटवृक्ष
त्या साऱ्या सूड नट्ट्यावर माझ्या एकाकी डोळ्यांचे आहे इथूनच लक्ष
मी आहे वटवृक्ष एकटाच ! रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची
सवय झाली आहे मला आता त्या वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश्श आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटाने, गुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत, दुर्दम्य आशा ठेवुन आहे मी जगण्याची.
लेखक / कवी - सुरेश पित्रे,
पत्ता - " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
Saturday, December 20, 2014
My country India bharat - poem
II दूर माझा सुजलाम देश II
प्रेमळ माझे बाबा आई
तशीच माझी खट्याळ ताई
माणसे आपली दूर दूर
मनी माझ्या हीच हुर हुर II१II
रक्ताची नाती आपली
प्रेमाची देती सावली
आठवण त्यांची मनात भरली
प्रतिमा त्यांची उरात कोरली II२II
तुम्हाविना मज करमत नाही
काही मजला उमजत नाही
तुमची जर का साथ नाही
या पैशाची किंमत नाही II३II
पैसा पैसा आणि पैसा
याच्याविना कोण बोले कैसा
पाण्याविना का जगेल मासा ?
पैशाविना का जमेल माणसा ? II४II
काळा पांढरा अरबी झगा
म्हणती इथे शिस्तीत वागा
चकाचक रस्ते मॉल मस्त
नवीन गाड्या, पेट्रोल स्वस्त II५II
आज मी इथे उजाड परदेश
दूर माझा सुजलाम देश
इथली तप्त भूमी वाळवंट
दूर आप्त हीच मनी खंत II६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
ekach pyala - only one glass - poem
II एकच प्याला II
दारू प्यायला, पिऊन झिंगला
तोल त्याचा गेला, झेकांडीत पडला
म्हणे घेतो मी , एकच प्याला II१II
मातीत मळला, चिखलात माखला
गटारात भिजला , नख शिखांत ओला
म्हणे घेतो मी , एकच प्याला II२II
घाणीत लोळला , उतारावर घसरला
घरंगळत गेला , पडला उठला पडला
म्हणे घेतो मी , एकच प्याला II३II
दारावर धडकला , घरात घुसला
बायकोशी भांडला , हात उगारला
म्हणे घेतो मी , एकच प्याला II४II
कीडणीस मुकला , तरीही प्यायला
भिजवूनी गळा , बायको मुला बाळां
म्हणे घेतो मी , एकच प्याला II५II
खूपच प्यायला , धाडदिशी कोसळला
प्राणांस मुकला , मेला तो मेला
म्हणे पेला मी , एकच प्याला II६II
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
village and city - poem
|| गांव आणि शहर ||
गावात बघावे तिकडे माडच माड ||१||
शहरात असते शुद्ध क्लोरिनचे पाणी
गावात असते निर्मळ झ-याचे पाणी ||२||
गावात मिळते गाईचे धारोष्ण शुद्ध दूध
शहरात मिळते प्लास्टीक पिशवीतले दूध ||३||
शहरात गाडी धुवायला पिण्याचे पाणी असते
दुष्काळी गावात प्यायला गढूळ पाणीही नसते ||४||
गावात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन भरपूर
शहरात अशुद्ध हवा , धुळीसोबत असतो धूर ||५||
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
|| माणूस शिक्षा भोगतो आहे ||
|| माणूस शिक्षा भोगतो आहे ||
डम्पिंगवर कचरा साठला
कचरा इथे जळतो आहे
श्वास इथे पुरा घुसमटला
धूर सर्वत्र पसरतो आहे ||
कचरा जळला, लागली आग
धूर विषारी हुंगतो आहे
आगीची पृथ्वीस,लागली धग
माणूस शिक्षा भोगतो आहे ||
आला जो आड वृक्ष कापला
मस्त शहर विस्तारत आहे
गावातला माड तोही कापला
बिनधास्त शहर वसत आहे ||
श्वास इथे पुरा घुसमटला
धूर सर्वत्र पसरतो आहे ||
कचरा जळला, लागली आग
धूर विषारी हुंगतो आहे
आगीची पृथ्वीस,लागली धग
माणूस शिक्षा भोगतो आहे ||
आला जो आड वृक्ष कापला
मस्त शहर विस्तारत आहे
गावातला माड तोही कापला
बिनधास्त शहर वसत आहे ||
भेटवस्तू देऊनी एक तुळस
वाढ दिवसाला द्यावी शुभेच्छा
निसर्ग जपण्यास नको आळस
शुद्ध हवा मिळो हिच इच्छा ||
लेखक / कवी - सुरेश पित्रे.
" वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
