Thursday, February 23, 2012

शोधा म्हणजे सापडेल : शब्दकोडे


नी
पू
र्वा
नि

का
ढा
मृ
गु
शो
नी
पू
र्वा
षा
ढा
मं
रू
धा
कृ
ता
र्वा
रो
हि
णी
दा
बु

नु
खा
म्ह
घा
त्ति
के
भा
चं
बु
शु
का
तू
का
द्र
चि
त्रा
नि

क्र
क्ष
जे
द्रा
नु
भा
वृ
ज्ये
ष्ठा
वि
त्र
सा
त्त
रा
षा
ढा
श्चि
र्क
सिं
शा
रा
पु
रा
धा
हू
मी
खा
शी
डे

पु
ष्य
कुं
मि
थु
रे
पि
ग्र
मी
श्ले
वृ
सिं
णी
श्र
मृ
र्व
मे
ती
कुं
ता
ब्द
 मं
सु
श्वि
नी
णे
रे
को
सं
ल्प
ना
सु
रे
पि
त्रे
ठा
णे
डे


शोधा म्हणजे सापडेल : शब्दकोडे
शोधा पाहू नक्षत्र, राशी, ग्रह, तारे .
वरील कोष्टकात नक्षत्र ,राशी,ग्रह आणि तारे यांची नावे उभी,आडवी, तिरकी दडलेली आहेत
ती शोधून काढा. काही नावे दोनदा , दोन ठिकाणी लिहिली आहेत, तर मग शोधा पाहू .
संकल्पना / कोष्टक रचना - सुरेश रघुनाथ पित्रे .
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी,
ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९        
Email ID - kharichavata@gmail.com

Tuesday, January 17, 2012

|| आजीबाईचा बटवा ||


           || आजीबाईचा बटवा ||
खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा 
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा 
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद 
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||१||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा 
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा 
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन 
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||२||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद 
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद 
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी 
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||३||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी 
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी 
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद 
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||४||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर 
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||५||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा 
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना  ||६||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर 
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||७||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस 
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस
छोटे छोटे आजार बर का घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||८||
कवी - सुरेश रघुनाथ पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , 

Sunday, January 8, 2012

REGARDING OCCUPATION CERTIFICATE - ओसी


नमस्कार,
शनिवार ७ जानेवारी २०१२ च्या वास्तुरंग पुरवणीमध्ये श्री सुधीर मुकणे ह्यांचा "घर खरेदी करताना " हा लेख वाचला ज्यामध्ये काहि 
अतिशय महत्वाचे मुद्दे आलें नाहीत , त्यासंदर्भात social network
द्वारे मला एक इमेल आला होता तो सुद्धा मी आपल्यासाठी पाठवित आहे , तर ह्या अनुषंगाने माझे साधे चार प्रश्न आहेत त्यांची उत्तरे मिळतील का ?
१)  सर्व आवश्यक कागद पत्र असून केवळ ओसी नसेल तर अशी जागा पूर्णपणे अधिकृत ठरेल का ? ओसी नसेल तर काय risk factor असू शकतो ?
२) ओसी विना  जागा अनधिकृत ठरून ती मालकीची तर असेल पण 
राहावयास अयोग्य ठरेल / असेल का ?
३) अशी जागा पुन्हा विकताना काहि अडथळे येऊ शकतात का ?
4) ओसी  नसेल  तरी  जागा  बिनधास्त  विकत  घेऊ  शकतो  का  ?
सदर  प्रश्नांची  सरळ  उत्तरे  कोणीच  देताना  दिसत  नाही.  
ह्या कळीच्या मुद्यांना सदर लेखामध्ये फक्त स्पर्श केलेला दिसला , सर्व सामान्य जनतेसाठी वरील प्रश्नाविषयी  सविस्तर  माहिती सांगू शकाल का ? ग्राहक राजा म्हणून सांगणे खूप महत्वाचे आहे 
काहि न दडविता सविस्तर माहिती दिली तर खर्या अर्थाने म्हणता 
येईल - लोकसत्ता , लोकमान्य लोकशक्ती हो कि नाही .
त्यासंदर्भात social network
द्वारे मला एक इमेल आला होता , खाली दिला आहे तोही वाचावा.
प्रेषक  - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ , 
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९           


---------- Forwarded message ----------
From: shri swami <shriswamidatta@gmail.com>
Date: 2012/1/8
Subject:  कोणी सांगू शकेल का ? PLEASE
To:
हि मी ठाणे , डोंबिवली,कल्याण इत्यादी ठिकाणची गोष्ट सांगत आहे

कोणी सांगू शकेल का ? PLEASE 
मला रिसेल फ्ल्याट विकत घ्यायचा आहे. पण समस्या अशी आहे कि 
मी जिथे जिथे फोन करतो तिथे ७०-८०% लोक सांगतात कि आमच्या 
जागेला ओसी नाही, सोसायटी रेजीस्टेर्ड आहे प्लान पास आहे, सीसी आहे KDMC 
APPROVED आहे . मला काहींनी सल्ला दिला आहे कि ओसी असल्याशिवाय 
जागा अधिकृत नसते , ओसी म्हणजे OCCUPATION CERTIFICATE
ज्याचा अर्थ असा आहे कि सर्व जागा अधिकृत आहे आणि तुम्हाला राहायला 
परवानगी सुद्धा आहे लाईट पाणी दिले कि शेवटी OC दिले  जाते का ?
 , नुसती जागा अधिकृत आहे  म्हणून राहायला परवानगी असतेच असे नाही,
हे खरे आहे का ?  म्हणून मी काही जणांकडे  गेलो त्यातल्या दोघांनी 
सांगितले आम्ही फक्त REGISTRATION , STAMP DUTY वगैरे करून देतो 
पण OC नसेल तर जागा अधिकृत का अनधिकृत हे सांगू शकणार नाही .
हल्ली अनधिकृत जागा सुद्धा REGISTER होते असा अजब कारभार चालला आहे असे काहि जण म्हणतात . 
१) कधी ओसी फक्त तळ मजल्याचे मिळते / घेतले जाते वरचे माजले अनधिकृत असतात हे खरे का ?
२) कधी ओसी संपूर्ण मजल्याला घेतले जाते ?
३) कधी ओसी प्रत्येक FLAT चे वेगळे घेतले जाते ?
४) तर कधी ओसी पूर्ण  बिल्डींगचे  घेतले जाते ?
खरे काय ते सांगावे.
तर आता माझा साधा असा प्रश्न आहे कि OC सोडून बाकी सर्व कागदपत्रे असतील 
तर माझी जागा (OWNERSHIP FLAT) हा अधिकृत ठरेल का ? 
कोणी मला ह्या घरातून हाकलून तर देणार नाही ना ?
माझे काही आर्थिक नुकसान होईल का ?

Wednesday, December 14, 2011

निसर्ग देतो एकच दणका



|| निसर्ग देतो एकच दणका ||


 निसर्ग अजून उदार आहे 
 जीवन सृष्टीला आधार आहे 
 मानवा किती तू लुटणार आहे?
 किती वृक्ष तू तोडणार आहे? ||||
श्वास तूच ना घेणार आहे 
`प्राणवायु वृक्ष देणार आहे 
झाड का तू तोडणार आहे 
जणू स्वतःस तू मारणार आहे ||||
 सिमेंटचे जंगल भरपूर आहे 
 गाड्यांचा विषारी धूर आहे 
 झाडे तोडण्याचा सूर आहे 
 माणूस किती मग्रूर आहे ||||
निसर्गास  तो शोषत आहे 
प्रदूषण ते  विस्तारत आहे 
मनुष्य  बेदरकार  आहे 
म्हणे  मीच  शूर  आहे ||||
 त्सुनामीचा एक फटका 
 भूकंपाचा  एकच धक्का 
 वादळाचा  एक  तडाखा  
 निसर्ग देतो एकच दणका ||||

कवी / प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता - "वैद्य सदन ", पहिला मजला,
राघोबा शंकर रोडलोअर चेंदणी,    
ठाणे (पश्चिम) ,पिन कोड क्र.-४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९        
(c/o) - 
०२२ - २५३२६४२९        
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - 
kavisureshpitre@gmail.com