| || नाग कथा , सर्प व्यथा || | |
| नागोबाला जंगलात पकडणे | मग त्याचे दात काढणे | पूजेसाठी शहरात आणणे | हि नव्हे नाग पूजा ||१|| नागोबाला टोपलीत डांबणे | बळेच त्याला दूध पाजणे | नागोबाला अर्धमेला करणे | हि नव्हे नाग पूजा ||२|| साप आहे उंदीर भक्षक | तो तर पिकाचा रक्षक | साप निसर्ग समृद्धी कारक | म्हणून देव मानावा ||३|| नाग मूर्ती नसावी प्लास्टरची | मूर्ती बनवा मातीची | किंवा कागद, लगद्याची | सहज पाण्यात विरघळते ||४|| पाटावर नागाचे चित्र काढावे | मग त्यास फूल वहावे | नाग प्रतिमेस वंदन करावे | अशी करावी नाग पूजा ||५|| उंदीर शेताची नासाडी करतो | त्या उंदराला साप खातो | शेतकरी सापांस मित्र मानतो | शेताच्या रक्षणासाठी ||६|| नाग शेताचे रक्षण करतो | शेतातले उंदीर खातो | अशा नागोबाला जो जपतो | तोच खरा सर्पमित्र ||७|| जशा असतात गोशाळा | जशा असतात धर्मशाळा | तशा बांधा सर्प प्रयोगशाळा | नागदंश लशीसाठी ||८|| सर्पाची वाटते भिती,शिषारी | फणाधारी नाग विषारी | काही सर्प असती बिनविषारी | ते जाणून घ्यावे ||९|| नाग उगाच चावत नाही | उगाच दंश करत नाही | खोडी काढता सोडत नाही | विष दंश करतो ||१०|| पावसाळ्यात पाणी वाढते | पाण्याने बीळ भरते | म्हणून नागाचे आगमन होते | आपुल्या घरात ||११|| | नाग दिसता गडबड करू नये | धावपळ करू नये | उगाच त्यास डिवचू नये | निमिषार्धात दंश करेल ||१२|| नाग दिसता शांत राहावे | त्याचे तान मान पहावे | नागासमोर कपडे टाकावे | दंश करण्यासाठी ||१३|| कपड्यांवर डसता विष जाईल | विषाचा धोका कमी होईल | मग तयांस पकडता येईल | नागसर्प मित्राद्वारे ||१४|| सर्प मित्रास संपर्क करावा | नाग सुरक्षीत पकडावा | नाग जंगलात सोडून द्यावा | सुखाने जगण्यासाठी ||१५|| चालवा सर्प शिक्षणाचे सत्र | शिकवा नाग पकडण्याचे तंत्र | निर्माण करावे सर्प मित्र | नागसर्प रक्षणासाठी ||१६|| डासांची अंडी बेडूक खातो | बेडकाला साप खातो | सापाला कींगकोब्रा खातो | हि आहे निसर्ग साखळी ||१७|| बेडूक,सर्प, अन्य सगळी | वन्य प्राणी मित्र मंडळी | जपावी हि निसर्ग साखळी | सृष्टीच्या अस्तित्वासाठी ||१८|| सर्प भिती सहाजिक आहे | पण सर्प मारणे योग्य नव्हे | जगावे आणि जगू द्यावे | हेच तत्व जपावे ||१९|| सापांस होईल खूप सजा | अशी नसावी क्रूर पूजा | नागपंचमीची करावी पूजा | सर्प वंश रक्षणाने ||२०|| नाग कथा हि वाचावी | तशीच लोकांस सांगावी | निसर्ग प्रेमींनी संग्रही ठेवावी | प्रसार प्रचारासाठी ||२१|| SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS |
| कवी - सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) , | |
| काहि नाग सर्प मित्र मंडळींचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत. | |
Sunday, September 25, 2011
नाग कथा , सर्प व्यथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment