Tuesday, April 17, 2012

|| विक्रमांचा बादशहा झालास तू सचिन ||


नमस्कार,
२००५ साली मीच लिहिलेली कविता शोध घेताना जरा उशीर झाला.
सचिन तेंडूलकरने १० डिसेंबर २००५, रोजी दिल्ली येथे श्रीलंकेविरुद्ध ३५ वी सेन्चुरी मारली आणि सुनील गावस्कर ह्यांचा ३४ शतकांचा विक्रम मोडला, त्यानंतर लगेचच नवीन वर्ष २००६ येत होते. त्यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सचिनला पाठवा, असे आवाहन काही संस्थांनी केले होते . त्यावेळी हि कविता मी केली होती, पण दुर्दैवाने मला " काहीनी फोन करून सांगितले की ह्यातील एक वाक्य " शतकांचे शतक पुरे कर तू आता" हे आम्हाला खटकले. मग माझे घरचे काही लोकहि म्हणाले की हो कवितेत हि जरा अतिशयोक्ती झाली आहे पण मी त्यांना ठासून सांगितले होते, की सचिन नक्की ५० तसेच १०० शतकांचाहि विक्रम करेल. आणि सचिन विषयी मी वर्तविलेला अंदाज खरा ठरला, हि कविता सचिन पर्यंत पोहोचेल अशी आशा करतो. असेच आणखी विक्रम सचिन प्रस्थापित करो हीच माझी शुभेच्छा.
सचिन तेंडुलकरला शुभेच्छा देणारी हि २००५ साली लिहिलेली कविता खरोखरच
माझा अंदाज भविष्यात खरे ठरविणारी ठरली. मला आनंद झाला.
|| विक्रमांचा बादशहा झालास तू सचिन ||
मास्टर, ब्लास्टर सचिन तेंडूलकर
चाहत्यांच्या हृदयी केलेस तू घर
असेच छान खेळून चाहत्यांना खुश कर
शतकांचे शतकही लवकर पुरे कर ||१||
प्रतिस्पर्ध्यांना पाजले तू वेळोवेळी पाणी,
तुझ्या यशाची ज्ञात जगाला कहाणी,
अनेकांची आज बोलली आहे वाणी,
सचिन आमचा हिरो दुसरा नाही कोणी ||२||
लाडका तू सर्वांचा आहेस रे सचिन,
एकाहून एक विक्रम केलेस तू नवीन,
चौकार, षटकार मारून अप्रतिम,
विक्रमांचा बादशाह झालास तू सचिन ||३||
भारत देशाचा आज वाढविलास मान,
तुजसम तूच रे जगी या महान,
क्रिकेट रसिकांची आज भागली तहान,
विश्व विक्रमी धावांनी अशीच वाढो शान ||४||
नवोदितांचा सचिन तूच रे आदर्श,
विक्रमी शतकाने झाला आज हर्ष,
होवो असाच तुझा सतत उत्कर्ष,
जावो आनंदाचे,शतकांचे तुला नूतन वर्ष ||५||
© सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९