|| कापडाची पिशवी, प्लास्टीकची पिशवी, कागदि पिशवी ||
कापडी पिशवीचा आग्रह धरा, प्लास्टिक पिशवी दूर सारा
पचन संस्थेच्या मार्गामधे प्लास्टीक अडकून अनेक प्राणी मरतात.
डाचत नाही का तुमच्या मनाला ? हुंगतो आपण प्रदूषित हवेला.
चीन कडून घ्यावी प्रेरणा, ज्यांनी ठरविले बांधूया ग्रीन वॉल ऑफ चायना.
पिशवी कापडी पर्यावरण पूरक, तशीच आहे निसर्ग रक्षक.
शमेल आग जागतिक तापमानाची, गरज आहे पर्यावरण रक्षणाची.
वीस पिशव्या कापडाच्या, भेट देऊ शकता तुम्ही वाढ दिवसाला.
प्लास्टीक पिशवीला नको म्हणा, कापडी पिशवी आपली जाणा.
स्टीकर, बाहुली, खेळणी प्लास्टिकची ह्यांचा पुनर्वापर करा.
करा सुरुवात कापडी पिशवी वापरायला, वेळ नाही लागणार पर्यावरण बदलायला.
चीनी वस्तू प्लास्टिकच्या असतील, त्या तुटल्या नंतर पुनर्वापरास देऊन टाका.
पिशवी कागदाची बनवायला शिका, आणि सर्वांना शिकवा.
शक्यतो प्लास्टिक पिशवी वापरू नका, गरजेपुरतेच प्लास्टीक वापरा.
वीषसर्प हा प्लास्टीकचा संपूर्ण विश्वाला डसतो आहे,
काळजी असेल तुम्हांस निसर्गाची तर वापरा पिशवी कापडाची.
गणेश मूर्ती बनविताना मातीबरोबर कागदाचा पुनर्वापर करा.
दिसतात छान कापडी पिशव्या, नको म्हणा तुम्ही प्लास्टीक पिशवीला.
पिशवी कागदाची जपून वापरा, कागद बनतो झाडापासून, त्याचा पुनर्वापर करा.
शक्य असेल तेव्हा प्लास्टीकला नको म्हणा, आवश्यक असेल तेवढेच वापरा.
वीजेची बचत करा, तसेच पाणी,कागद,प्लास्टीकचा पु नर्वापर केलाच पाहिजे.
कवी / प्रेषक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , २५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com